कराड : मलकापूर शहराची वाढती लोकसंख्या व विस्तार पाहता मलकापूर शहराचे नगरभूमापन होण्यासाठी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी महसुलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांना विनंती केली होती. त्यानुसार महसुलमंत्र्यांनी याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार अप्पर आयुक्त आनंद रायते यांनी महाराष्ट्र शासनाने मलकापूर शहराचे नगर भूमापनासाठी १ कोटी रुपयांची तरतुद केली असून जिल्हाधिकारी यांच्याकडे निधी वर्ग करण्याबाबत संबंधितांना सुचना दिल्या असल्याची माहिती मलकापूर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, मलकापूर नगरपंचायतीची स्थापना 5 एप्रिल 2008 रोजी झाली असून तात्कालिन नगरपंचायतीने शहराचा शहर विकास आराखडा तयार केला आहे. त्यानुसार शहरामधील नागरिकांना आवश्यक असणाऱ्या नागरी सुविधांसाठी जागा उपलब्ध झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने सांडपाणी प्रक्रिया, घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा योजना व भाजी मंडई आदींचा समावेश आहे. मलकापूर शहराचे नगरभूमापन व्हावे, याकरिता नगरपंचायत स्थापनेपासून शासनस्तरावर पाठपुरावा केला जात असून सन 2011-12 या सालामध्ये मलकापूर शहरासाठी 1 कोटीची तरतुद शासनाच्या अंदाजपत्रकात तयार करण्यात आली होती. तथापि, काही तांत्रिक अडचणीमुळे याबाबतची पुर्तता राहिली होती. याबाबत पाठपुरावा केल्यांनतर हा निधी उपलब्ध झाला आहे.
दरम्यान, त्याअनुषंगाने लागणारी सर्व कागदपत्रे उपलब्ध करणे, तसेच शहराचे नगरभूमापन करण्यासाठी 1 कोटी पेक्षा ज्यादा होणाऱ्या खर्चाची तरतुद करण्याबाबतची सुचनाही नगरपालिकेस देण्यात आली आहे. यामुळे मलकापूर शहराचे नगरभूमापन होऊन मिळकत धारकांना स्वतंत्र मिळकत उतारा प्राप्त होऊन भविष्यामध्ये जागे संदर्भात होणारे वाद टाळण्यास मदत होणार आहे. याबरोबरच शहर विकास योजनेमधील विविध विकासकामे अचुकपणे करता येणार आहेत.
मलकापूर शहराचे नगरभूमापन व्हावे, यासाठी सातत्याने नगरपालिकेमार्फत पाठपुरावा केला जात होता. शहराची वाढ नियंत्रित व सुनियोजीत होण्यासाठी असणाऱ्या जमिनींचे कागदपत्रे व मापे अद्यावत असणे आवश्यक असल्याने नगरभूमापनाच्या माध्यमातून याबाबी पूर्ण होणार आहेत. नगरभूमापनसाठी राज्य शासनाकडून स्वतंत्र विशेष घटक युनिट नियुक्त करुन हे काम पुर्ण करण्यात येणार आहे.
या कामासाठी भूमीअभिलेख पुण्याचे उपसंचालक बाळासाहेब काळे, संलग्न जमाबंदी आयुक्त (नागरी भूमापन) उपसंचालक किशोर तवरेज, कराड भूमीअभिलेख कार्यालयाचे उपअधिक्षक बाबासाहेब भोसले यांनी मोलाचे सहकार्य केले. ही मलकापूर नगरवासियांसाठी नवीन वर्षाची भेट असून नवीन वर्षात हे काम सुरु होणार असल्याची माहितीही उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |