12:13am | Sep 30, 2020 |
सातारा : रस्त्यावर पडलेले पैसे, पाकिट, मोबाईल परत मिळेल याची सध्याच्या परिस्थितीत शाश्वती देता येत नाही. मात्र दोन दिवसांपूर्वी एका कॉलेज युवकाला सापडलेले पाकिट सर्व चीजवस्तूंसह पोलिसांकडे सुपूर्द करण्याचा प्रामाणिकपणा त्याने दाखवला आणि पोलिसांनी देखील कागदपत्रांवरुन मूळ मालकाचा शोध घेवून ते त्याच्यापर्यंत पोहोचवून आपले कर्तव्य चोखपणे बजावत आदर्श जपल्याची घटना समोर आली आहे.
दोन दिवसांपूर्वी सातार्यातील राहूल किर्तीकर यांनी सदरबझार परिसरात पानपट्टीवर खरेदी केली व पानपट्टीचालकाला पैसे देवून ते घरीही परतले. मात्र, त्यांचे पाकिट पँटीच्या खिशातून खाली पडल्याचे त्यांना कळले देखील नव्हते. दुसर्या दिवशी लक्षात आल्यावर पानटपरीवर गेले व चालकाला पाकिट पडले होते का? असे विचारले तर त्याने नाही म्हणून सांगितले.
पाकिटात 5 हजार रुपये व पॅनकार्ड, आधारकार्ड, व्होटरकार्ड, एटीएम अशी सर्व कागदपत्रे गहाळ झाल्याने किर्तीकर पॅनिक झाले होते. शोधाशोध करुन ते हताश झाले पाकिट मिळाले नाही. मात्र त्यांना दि.27 तारखेला पोलिसांकडून फोन आला व त्यांचे पाकिट सापडले असल्याचे सांगण्यात आले. त्यांना सायन्स कॉलेजजवळ असलेल्या निर्भया पोलीस चौकीत येण्यास सांगितले. तिथे गेल्यानंतर पोलीस कर्मचारी सुहास कदम, अमित साळुंखे व आकाश दळवी यांनी किर्तीकर यांच्याकडे खातरजमा केल्यावर त्यांचे पैसे व सर्व वस्तूंसह त्यांना पाकिट परत केले.
मात्र आपले पाकिट पोलिसांकडे कसे आले? असा प्रश्न किर्तीकरांना पडला. त्यावेळी पोलिसांकडूनच कॉलेज युवकाच्या प्रामाणिकपणाचा आदर्श समोर आला. सदरबझार परिसरात पडलेले किर्तीकर यांचे पाकिट जावली तालुक्यात पण शिक्षणासाठी सदरबझार येथील प्रथमेश चेंबर्समध्ये रहात असलेल्या प्रतिक दळवी याला सापडले होते. पाकिटात पैसेही होते. मात्र त्याला मोह झाला नाही. त्याने पाकिट जसे सापडले तसे ते निर्भया पोलीस चौकीतील पोलीस कर्मचार्यांकडे दिले. कर्मचार्यांनी देखील आपले कर्तव्य चोखपणे बजावत ते किर्तीकर यांच्यापर्यंत पोहोच केले.
आता आपले पाकिट गेलेच, असे गृहीत धरलेल्या किर्तीकरांना प्रतिक दळवी या युवकाने अजूनही प्रामाणिकपणा जिवंत असल्याचा प्रत्यय आणून दिला. त्याचे कौतुक म्हणून किर्तीकर देत असलेले बक्षीस देखील नको, म्हणत प्रतिक याने नाकारले. प्रतिक खर्या अर्थाने सर्वांपुढे आदर्शाचे प्रतिक ठरला एवढे मात्र निश्चित.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |