04:02pm | Aug 01, 2020 |
फलटण: शेतीपूरक व्यवसाय दुध आणि दुध पावडला अनुदान मिळालेच पाहिजे या मागणीसाठी आज दुपारी फलटणमध्ये खासदार रणजितसिंह नाईक - निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली फलटणमधील भाजपा पदाधिकार्यांनी आंदोलन केले.
भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज दि.1 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. आज फलटणमध्ये खासदार रणजितसिंह नाईक - निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील क्रांतीसिंह नाना पाटील चौकात भाजपा, रासप, रयत क्रांती संघटना या महायुतीच्या वतीने क्रांतीसिंह नाना पाटलांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी दूध उत्पादक शेतकरी उपाशी ठाकरे सरकार तुपाशी, दूध उत्पादक शेतकर्यांना दरवाढ मिळालीच पाहिजे, दुधाचे 10 रुपये अनुदान थेट शेतकर्यांच्या खात्यात मिळाले पाहिजे, दूध पावडरचे 50 रुपये अनुदान थेट शेतकर्यांच्या खात्यात मिळाले पाहिजे, किसान के सम्मान मे भाजपा मैदान मे या घोषणा यावेळी देण्यात आल्या.
यावेळी फलटण पालिकेचे विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक - निंबाळकर, भाजपा तालुकाध्यक्ष सुशांत निंबाळकर, नगरसेवक अशोक जाधव, सचिन अहिवळे, अभिजीत नाईक- निंबाळकर, फलटण शहराध्यक्ष उदय मांढरे, काशिनाथ शेवते, खंडेराव सरग, रमेश चव्हाण, शेखर खरात, अशोत लपाते, मामुशेठ वीरकर, राहुल पिसाळ, विमल भुजबळ, उषा राऊत आदी उपस्थित होते.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |