11:05pm | Aug 06, 2020 |
सातारा : जिल्ह्यात आज दिवसभरात 203 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाल्याने जिल्ह्याने आज कोरोनाचा पाच हजारांचा टप्पा ओलांडला आहे. याचबरोबर चोवीस तासात जिल्ह्यातील 7 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून 77 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
सातार्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या त्याचबरोबर होणारे कोरोनाबळी यामुळे जिल्हाप्रशासनाची झोप उडाली आहे. आज दिवसभरात 202 नवीन कोरोनाबाधितांची जिल्ह्यात नोंद झाल्याने कोरोनाने जिल्ह्यातील पाच हजारांचा आकडा ओलांडला आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 5179 झाली आहे. तसेच आज 7 जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबळींची संख्या 159 वर पोहोचली आहे. जिल्ह्यातील विविध रुग्णालये तसेच कोरोना केअर सेंटरमधून आज कोरोनातून ठणठणीत बरे झाल्याने 77 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनामुक्तांची संख्या 2411 वर पोहोचली आहे. आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या बाधितांचा तपशील पुढीलप्रमाणे -
कराड तालुक्यातील येळगाव येथील 46 वर्षीय महिला व 16 वर्षीय युवक., शारदा क्लिनिक कराड येथील 40 वर्षीय पुरुष, सावडे येथील 32,52, 35 वर्षीय पुरुष., कालवडे येथील वय 1 वर्षीय बालिका व 35, 42 वर्षीय महिला व वय 14, 7, 14, 12, 45, 13, 31, 39 वर्षीय पुरुष., बनवडी येथील 40 वर्षीय महिला., सैदापूर येथील 32 वर्षीय पुरुष., कोर्टी येथील 40 वर्षीय महिला., शिवदे येथील 25, 63,29, 27 वर्षीय पुरुष व 23 वर्षीय महिला., उंब्रज येथील 13 वर्षीय युवक व 65, 25 वर्षीय पुरुष., सजुर येथील 60 वर्षीय पुरुष., वडगाव हवेली येथील 22, 37 वर्षीय पुरुष., किवळ येथील 36 वर्षीय पुरुष., मलकापुर येथील 25, 42 वर्षीय महिला व 2 वर्षीय बालिका व 31, 25 वर्षीय पुरुष., कृष्णा मेडीकल कॉलेज येथील 25, 27 वर्षीय महिला., खुबी येथील 52 वर्षीय पुरुष., कार्वे येथील 32 वर्षीय महिला., आगाशिवनगर येथील 25 वर्षीय पुरुष., नंदगाव येथील 52 वर्षीय महिला., ओंडोशी येथील 10, 14 वर्षीय बालीका व 2 वर्षीय बालक., पाटण तालुक्यातील चाफळ येथील 28 वर्षीय पुरुष., अंब्रग येथील 55, 31 वर्षीय पुरुष व 40 वर्षीय महिला., मल्हारपेठ येथील 28 वर्षीय पुरुष., खाले येथील 50 वर्षीय महिला., पाटण येथील 16 वर्षीय युवती., बांबवडे येथील 21 वर्षीय महिला., कवठेकरवाडी येथील 58 वर्षीय पुरुष., नेरले येथील 45 वर्षीय महिला., वाई तालुक्यातील बोपेगाव येथील 18 वर्षीय युवती., धनगरवाडी येथील 30 वर्षीय पुरुष., सातारा तालुक्यातील सोनापूर येथील 32, 58 वर्षीय महिला व 68 वर्षीय पुरुष., सातारा शहरातील लक्ष्मी टेकडी सदरबझार येथील 24, 28, 32, 55 वर्षीय महिला व 62, 35 वर्षीय पुरुष तसेच 3 महिला व 2 पुरुष., जिहे येथील 45 वर्षीय पुरुष., भैरवनाथ कॉलनीतील 33 वर्षीय पुरुष., खंडाळा तालुक्यातील कबुले आळी शिरवळ येथील 57 वर्षीय पुरुष., कोरेगाव तालुक्यातील वाठार येथील 17 वर्षीय युवक व 5 वर्षीय बालिका.
386 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 31, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 8, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 27, कोरेगांव 10, वाई येथील 46, शिरवळ येथील 62, रायगाव येथील 42, पानमळेवाडी 30, मायणी 13, महाबळेश्वर 28, पाटण 20, कृष्णा हॉस्पिटल कराड येथील 69 असे एकूण 386 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असुन पुणे व कराड येथे तपासणी करीता पाठविण्यात आले असल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले.
7 कोरोनाबाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू
सातारा क्रांतीसिह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात कोरेगाव येथील 43 वर्षीय महिला, वासोळे ता. सातारा येथील 43 वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला आहे. सातार्यातील खाजगी रुग्णालयात शहरातील गुरुवार पेठेतील 75 वर्षीय महिला, कोडोली ता. सातारा 58 वर्षीय महिला, जकातवाडी ता.सातारा येथील 75 वर्षीय पुरुष या तिघा कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यांचे खाजगी प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आलेले अहवाल कोरोनाबाधित आहेत. कराड येथील खासगी रुग्णालयात आटके, ता. कराड येथील 82 वर्षीय महिला, तसेच कराड येथील खाजगी रुग्णालयात सोनवडे ता.पाटण येथील 68 वर्षीय कोरोनाबाधित पुरुषाचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती डॉ. गडीकर यांनी दिली.
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |