03:52pm | Oct 27, 2021 |
सातारा : समाजाला सुसंस्कारित करण्यासाठी शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला मातृभाषेतून शिक्षण मिळायला हवे. कोणत्याही विषयाचा आशय भाव हा मातृभाषेतूनच सहज व्यक्त होतो, असे प्रतिपादन महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे संचालक जयंत इनामदार यांनी व्यक्त केले.
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या सातारा येथील कन्या शाळेच्या शताब्दी वर्ष समारोहाला शानदार सुरवात झाली. या देखण्या पण आटोपशीर झालेल्या सोहळ्याला संस्थेचे कार्याध्यक्ष रविंद्र देव, सचिव सी.व्ही.शास्त्री, शाळा समितीचे अध्यक्ष दत्ताजी थोरात, कन्या शाळेच्या प्राचार्य कविता जगताप, संस्थेच्या आजन्म सेविका समीक्षा निकम, वाई कन्या शाळेचे संचालक प्रभाकर सोनपाटकी यावेळी उपस्थित होते.
इनामदार पुढे म्हणाले, "कोणतीही संस्था किंवा त्याच्या कोणत्याही शाखेची समृध्दी ही त्या संस्थेसाठी अखंड झटणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमुळे असते. महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या विचारांवर श्रध्दा ठेऊन महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची अखंड वाटचाल सुरू आहे. कन्या शाळा सातारा या शाखेने सुध्दा साताऱ्याच्या अनेक गरजू मुली, स्त्रिया यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून आत्मनिर्भर केले आहे. कन्या शाळेच्या शताब्दी वर्षाच्या शुभारंभ आणि शाखेच्या जडणघडणीत अनेक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचा मोठा वाटा आहे, हे नाकारून चालणार नाही. शंभर या शब्दात मोठी गंमत आहे. शं म्हणजे शंका कुशंका सोडविणारी, भ म्हणजे भरभराट, र म्हणजे कोणत्याही वारी शिक्षणासाठी अखंड झटणारे शिक्षक अशी शंभरीची व्याख्या इनामदार यांनी मांडली. समाजामध्ये संस्कार पेरण्याचे काम शिक्षक करतात मात्र या संस्काराचा वारसा विद्यार्थ्यांना मातृभाषेतून मिळावा, कोणतीही मातृभाषा सहजपणे व्यक्त होण्याचे माध्यम असते, असेही ते म्हणाले.
संस्थेचे कार्याध्यक्ष रविंद्र देव यांनी सोहळ्याच्या अध्यक्षपदावरून बोलताना, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या चौफेर विस्ताराचा आढावा घेतला. कोरोनाच्या गंभीर काळातही स्त्रियांना आत्मनिर्भर बनविण्याची बांधिलकी संस्थेने जोपासली. गरजू रुग्णांच्या उपचारांसाठी संस्थेने कोविड केअर सेंटर चालविल्याचा दाखला त्यांनी दिला. कन्या शाळेच्या शताब्दी महोत्सवाच्या नेटक्या संयोजनाचे त्यांनी मनापासून कौतुक करत, शाखेच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांचे स्वागत संस्थेच्या वतीने दत्ताजी थोरात यांनी केले. संस्थेच्या शताब्दी वर्षाच्या शिल्पकृतीचे प्रमुख पाहुण्यांनी अनावरण करून महर्षी कर्वे यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. शताब्दी वर्षातील आगामी कार्यक्रमांचा आढावा पर्यवेक्षक चंद्रकांत ढाणे यांनी घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य कविता जगताप यांनी केले. संस्थेच्या आजन्म सेविका समीक्षा निकम यांनी संस्थेला पासष्ट हजाराची देणगी दिली. उपमुख्याध्यापक हणमंत भांडवल कर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन गजानन पाडळे व सुजाता आगाशे यांनी केले.
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |