सातारा : कर्ज असलेल्या जमिनीचा व्यवहार करुन त्याबाबत खोटी कागदपत्रे तयार करुन लिलावात घेतलेले प्लॉटींग घोळाचे असल्याचे समोर आल्याप्रकरणी सातार्यातील साहेबराव को. ऑपरेटीव्ह बँकेच्या पदाधिकार्यांविरुध्द सातारा शहर पोलिस ठाण्यात फसवणूकीची तक्रार दाखल झाली. 8 कोटी 3 लाख रुपयांची फसवणूक झाली असून एकूण 19 जणांवर गुन्हा दाखल झाला अहे.
बँकेचे तत्कालीन चेअरमन सुभाष देशमुख, बिपीन कुरतडकर, खामकर, अनिल कदम, हणमंत बोडके, विठ्ठल चिकणे, प्रकाश जुनघरे, अनिल मेहता, विशाल शहा, एस.डी.जाधव विजय शिंदे, राजेश्वर कासार, यांच्यासह इतर संशयितांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी संजय चंद्रकांत मोरे (वय 63, रा. वाई जि.सातारा) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ही घटना 2010 ते 21 जानेवारी 2023 या कालावधीत घडली असल्याचे म्हटले आहे. संशयितापैकी एकाची सातारा शहरानजीक खिंडवाडी येथे सुमारे 11 एकर शेत जमिन आहे. त्यावर साहेबराव देशमुख को.ऑप. बँकेचे 3 कोटी रुपयांचे कर्ज घेतलेले होते. कर्ज असतानाही ती जमीन एका बनावट स्थापन केलेल्या फर्मला विकण्यात आली. पुढे या कंपनीने पुन्हा मूळ मालकाला जमीन विकली व त्यानंतर मालकाने त्याचे 75 प्लॉट केले. त्यापैकी 6 प्लॉट विकण्याची परवानगी बँकेने दिली.
तक्रारीत पुढे असे म्हटले आहे की, सहा प्लॉटपैकी पाच प्लॉट मालक नसलेल्या कंपनीने इतरांना विकले. काही प्रॉपर्टी तक्रारदार संजय मोरे यांनीही घेतली. तक्रारदार यांना त्यावर डेव्हलपमेंट करायची असल्याने ते कर्जासाठी प्रयत्न करत असताना त्यांना धक्कादायक माहिती मिळत गेली. बँकेने लिलावात दिलेली कागदपत्रे बोगस असल्याचे समोर आले. त्यानुसार माहिती काढत तक्रारदार यांना संंबंधित संशयितांनी आपाआपसात संगनमत करुन फसवणूक केल्याचे समोर आले. फसवणूक झाल्याचे समोर आल्याने त्यांनी पोलिस ठाण्यात जावून तक्रार दिली.
तडवळे सं. वाघोली येथील स्टोन क्रशर बंद करा |
मोबाईलची चोरी |
सुमारे साडेसात लाख रुपयांच्या दागिन्यांसह रोख रकमेची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा |
गाडीच्या बॅटऱ्यांची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
दुकानातील साहित्य चोरी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अमितवर फायरिंग करुन हल्लेखोरांनी चिरला होता त्याचा गळा |
महिलेच्या खून प्रकरणातील आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या |
शहर पोलिसांची चौकशी करा |
गणेश जयंती निमित्त साताऱ्यात उद्या विविध कार्यक्रम |
...तर सहकाराला कोणीही पराभूत करु शकणार नाही : विद्याधर अनास्कर |
कोयता गँगच्या दहशतीनंतर वाढे फाटा येथे गोळीबार |
घरफोडी करून 8 हजारांचे साहित्य चोरीस |
उपचारापुर्वी एकाचा मृत्यू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
दुकानातील साहित्य चोरी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अमितवर फायरिंग करुन हल्लेखोरांनी चिरला होता त्याचा गळा |
महिलेच्या खून प्रकरणातील आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या |
शहर पोलिसांची चौकशी करा |
गणेश जयंती निमित्त साताऱ्यात उद्या विविध कार्यक्रम |
...तर सहकाराला कोणीही पराभूत करु शकणार नाही : विद्याधर अनास्कर |
कोयता गँगच्या दहशतीनंतर वाढे फाटा येथे गोळीबार |
घरफोडी करून 8 हजारांचे साहित्य चोरीस |
उपचारापुर्वी एकाचा मृत्यू |
धक्काबुक्की केल्याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी दाखल |
दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून बॅटर्यांची चोरी |
शॉक लागून एकाचा मृत्यू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
8 कोटी 3 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी 19 जणांवर गुन्हा |