फलटण : फलटण - सातारा रोडवर गांजाची अवैधरित्या वाहतूक करणार्या दुचाकी स्वारास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याकडे सुमारे 2 किलो 25 ग्रॅम गांजा सापडला आहे. गांजा व दुचाकी जप्त करून दुचाकीस्वारास पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान आरोपीस न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने आरोपीस पोलिस कस्टडी सुनावली आहे.
फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, फलटण शहर पोलीस स्टेशनचे पो.कॉ.संदिप लोटे, पो.का.विजय दुधाळकर, होमगार्ड जाधव व नाचन हे नाकाबंदी करीत असताना रात्री एकजण संशयीतरित्या होंडा ड्रीम मोटार सायकल क्रमांक-एम.एच.11 बी.यु 3411 या दुचाकीवरुन, फलटण बाजुकडे आल्याने त्याला थांबवण्यात आले. पोलीसांना त्याचा संशय आल्याने पोलीसांनी त्याच्या पाठीवरील सॅकची पाहणी केली असता, सॅकमधील प्लॅस्टीकच्या पिशवीमध्ये गांजा आढळून आला.
पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांचे सुचनांप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक सचिन राऊळ, पोलीस उपनिरीक्षक संदिप बनकर यांनी पंचांच्या समक्ष संबंधितास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव सिकंदर इस्माईल बागवान (वय 41, रा. बुधवार पेठ, तेली गल्ली, फलटण, ता.फलटण जि.सातारा) असे सांगितले. सिकंदर बागवान याची पंचांच्या समक्ष अंगझडती घेतली असता त्याच्याकडे असणार्या सॅकमधील प्लॅस्टीकच्या पिशवीत सुमारे 2 किलो 25 ग्रॅम वजनाचा गांजा, मोबाईल फोन, मोटार सायकल, रोख रक्कम असा एकुण 79 हजार 190 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असुन आरोपीचे विरुध्द पोलीस कॉन्स्टेबल संदिप लोटे यांनी गुन्हा दाखल केला असुन या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संदिप बनकर है करीत आहेत. आरोपीस अटक करण्यात आलेली असुन त्याला न्यायालयाने पोलीस कस्टडी मंजुर केलेली आहे.
ही कारवाई सातारा पोलीस अधीक्षक अजय बन्सल, अपर पोलीस अधिक्षक धिरज पाटील, पोलीस उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांच्या सुचनांप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक सचिन राऊळ, पोलीस उपनिरीक्षक संदिप बनकर, पो.कॉ.संदिप लोटे, पो.कॉ. विजय दुधाळकर, अय्याप्पा ठाकुर, नितिन चतुरे, तांब, होमगार्ड जाधव व नाचण यांनी केली आहे.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |