सातारा: अनेक गुन्ह्यांमध्ये पुणे ग्रामीण पोलिसांना पाहिजे असलेल्या कुख्यात गुंड गज्या मारणेला मेढा पोलिसांनी शिताफीने पकडले. आज कुख्यात गुंड गज्या मारणे, त्याचे साथीदार व जप्त केलेल्या ऐवजासह पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस दलाच्या ताब्यात देण्यात आले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे ग्रामीण पोलीस दलाला अनेक गुन्हयांमध्ये पाहिजे असलेला आरोपी हा सातारा जिल्हयामध्ये असल्याची माहिती प्राप्त झाल्याने, व त्याने जेलमधून सुटल्यानंतर मोठया जनसमुदायाने रॅली काढल्याबाबत त्याच्यावर गुन्हा नोंद असल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी सातारा जिल्हयातील पोलिसांना त्यास पकडून कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या.
दि.6 मार्च रोजी मेढा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने हे रात्री 08.15 वा. सुमारास मेढा चौक येथे एस.बी.आय.एटीएम समोर पेट्रोलिंग करत असताना पेट्रोलिंग दरम्यान त्यांना माहिती मिळाली की, पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस दलास पाहिजे असलेला आरोपी गजानन उर्फ गज्या पंढरीनाथ मारणे (वय 55 वर्षे) व त्याचे तीन साथीदार सुनिल नामदेव बनसोडे (वय 40), संतोष विश्वनाथ शेलार (वय 40) सचिन दत्तात्रय घोलप (वय 39) सर्व रा. कोथरूड पुणे हे क्रेटा कार क्र.एम.एच.12 क्युवाय/2167 मधून मेढा येथे येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती.
सदरची बातमी जिल्हा पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल यांना कळविल्यानंतर त्यांनी अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग श्रीमती डॉ.शितल जानवे-खराडे यांचे मार्गदर्शनाखाली पो.हवा.जितेंद्र कांबळे, पो.ना.अमोल पवार, इमग्राण मेटकरी यांना शासकिय वाहनातून घेवून पेट्रोलींग करत असताना. मेढा चौक येथे मिळाले बातमीप्रमाणे संशयित कार मिळुन आल्याने त्या कारचा सपोनि अमोल माने व तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी शासकिय वाहनाने पाठलाग करुन मेढा चौक येथे बातमीतील क्रेटा कारला धाडसाने गाडी आडवी मारुन क्रेटा कार थांबवून कारचे जवळ जावून कारमधील इसमांना तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी खाली उतरवून चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे गजानन उर्फ गज्या पंढरीनाथ मारणे (वय 55 वर्षे), सुनिल नामदेव बनसोडे (वय 40), संतोष विश्वनाथ शेलार (वय 40), सचिन दत्तात्रय घोलप (वय 39) सर्व रा. कोथरुड पुणे अशी असल्याचे सांगितले.
यातील पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस दलास पाहिजे असलेला आरोपी गजानन पंढरीनाथ मारणे हा असल्याने सदर इसमांना सरकारी वाहनात बसवून मेढा पोलीस ठाणे येथे त्यांचे क्रेट कारसह आणले व अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडे 1,52,000/- रुपये रोख रक्कम 6 मोबाईल हॅन्डसेट व क्रेटा कार असा सुमारे 11,52,000/- किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. वरिष्ठांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार पंचासमक्ष मालाचा पंचनामा करुन मिळून आलेल्या इसमांना पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस दलाच्या ताब्यात मुद्देमालासह देण्यात आले आहे.
सदर कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलिस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.शितल जानवे-खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली मेढा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने, पो.हवा. जितेंद्र कांबळे, पो.ना.अमोल पवार, इमग्राण मेटकरी, संदीप फणसे यांनी केलेली आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |