08:37pm | May 21, 2022 |
सातारा : बदलत्या काळाबरोबर मानवी जीवनातील गरजाही बदलत आहेत, बदलणाऱ्या गरजा भागविण्याची जबाबदारी उद्योग विश्वाची असते. त्यामुळे उद्योग विश्वात रोज नवनव्या संधी उपलब्ध होत असतात. तेव्हा पारंपरिक मानसिकतेतून बाहेर येऊन नोकरी बरोबरच उद्योगधंद्यांकडेही रोजगाराचा मार्ग म्हणून बघावे लागेल, असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजिका हेमलता भोसले यांनी केले.
सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात विद्यार्थिनींना व्यवसाय कौशल्य आणि आर्थिक व्यवहार यांचे प्रत्यक्ष अनुभव घेता यावेत या उद्देशाने ट्रेड फेअर डे आणि महाविद्यालयात शिकवल्या जाणाऱ्या शॉर्ट टर्म अभ्यासक्रमांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन हेमलता भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना भोसले यांनी आजच्या काळात असलेले उद्योगक्षेत्रातील संधींचे महत्त्व विशद केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे ऑडिटर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे होते, तर आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या प्राचार्या डॉ. वंदना नलावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे कार्याध्यक्ष प्रो. डॉ. एस.एम भोसले, कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. सुनिता घार्गे, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य व ट्रेड फेअर डे चे समन्वयक डॉ. एस. एस. पवार, शॉर्ट टर्म अभ्यासक्रमाच्या समन्वयक प्रा. मंदाकिनी वर्णेकर, नॅक समन्वयक डॉ. जयश्री आफळे यांची उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्या डॉ. वंदना नलावडे यांनी विद्यार्थ्यांना वर्तमान काळातील आर्थिक समस्यांची जाणीव करून दिली. कोणतेही काम हलके किंवा कमी दर्जाचे नसते हे सतत लक्षात ठेवावे, असेही त्या म्हणाल्या.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी जागतिकीकरणानंतर बदललेल्या अर्थव्यवस्थेत सर्वत्र खाजगीकरण सुरू असताना सरकारी नोकरीसाठी सुरू असलेली स्पर्धा लक्षात घेऊन उद्योगक्षेत्रातील संधींकडे गांभीर्याने बघायला हवे, असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. एस.एस.पवार यांनी केले. अहवाल वाचन प्रा. मंदाकिनी वर्णेकर यांनी केले. आभार प्रा.डॉ. जयश्री आफळे यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. निरंजन फरांदे यांनी केले.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |