09:08pm | Jan 12, 2022 |
सातारा : चितळी, ता. खटाव येथील अपहरणासह दरोड्याचा गुन्हा उघड करून मुख्य सूत्रधारासह ९ संशयितांना जेरबंद करण्यात सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले.
किरण गुलाब गावीत (वय ३२, रा.विद्यानगर कराड), बिरजू उर्फ सतिश विलास रजपूत उर्फ कांबळे (वय ३८, रा.शांतीनगर, इचलकरंजी), विशाल उर्फ सागर हरीभाऊ ननावरे उर्फ गुरव (वय २९, रा.सोमंथळी ता.फलटण), दुशांत मनोहर पांढरपट्टे (वय ३१, रा.निपाणी जि.बेळगाव), अभिजीत सुरेश खंडागळे (वय ३५, रा.राधानगरी, जि.कोल्हापूर सध्या रा.निपाणी), प्रविण बाळासो शेवाळे (वय २६, रा.घोगाव, ता.कराड), बाळु तुकाराम भोसले (वय ३१, रा.दुर्गामाता चौक, इचलकरंजी), किशोर अंबादास निलंगे (वय २७, रा.शहापूर, पाटील मळा, इचलकरंजी), विशाल आनंदा शेवाळे, (वय ३०, रा.मलकापूर, ता.कराड) अशी संशयितांची नावे आहेत.
सातारा येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना पोलीस अधीक्षक अजय बन्सल म्हणाले, १९ डिसेंबर रोजी रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास चितळी, ता. खटाव गावच्या हद्दीत पंढरपूर - मल्हारपेठ जाणाऱ्या मार्गावर मोहिते मळा येथे फिर्यादी ऋषिकेश राजेंद्र शेटे रा. उंब्रज, ता. कराड हे झरे, ता. आटपाडी येथून उंब्रजकडे जात असताना त्यांच्या एस. क्रॉस गाडीला दुचाकीने पाठीमागून धडक देऊन संशयितांनी त्यांची गाडी थांबवली. दुचाकीवरील दोघे व अन्य दोघांनी त्यांचे व त्यांच्या मित्राचे अपहरण करून शिवीगाळ, दमदाटी, मारहाण करत त्यांच्याकडून ९५ हजार रुपये किमतीचा मोबाइल, टॅब व घड्याळ असा मुद्देमाल चोरून नेला. त्या दोघांनाही हात पाय बांधलेल्या अवस्थेत पुसेसावळी जवळील एका शेतात सोडून संशयित निघून गेले. याबाबतची तक्रार वडूज पोलिस ठाण्यात दाखल झाल्यानंतर सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला हा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या.
यानुसार सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या अधिपत्याखाली पथक स्थापन केले. या पथकाने फिर्यादी तसेच साक्षीदार यांच्याकडे विचारपूस केली असता फिर्यादीचे अपहरण करून त्यांचा मोबाइल टॅब काढून घेऊन त्याचे सर्व पासवर्ड माहीत करून ते अनलॉक करून घेतले होते. त्यामुळे फिर्यादीने घरी आल्यानंतर लगेच त्याचे व्हॅलेंटचा युजर आयडी, पासवर्ड राखून पाहिले असता त्याच्या क्रिप्टोकरन्सीचा ८० हजार डॉलर म्हणजे ६४ लाख रुपये दुसऱ्या व्हॅलेंटला ट्रान्सफर झाल्याचे दिसले.
फिर्यादी ऋषिकेश शेटे हे मागील काही वर्षापासून ट्रेडिंगचा व्यवसाय करत होते. त्यामुळे शेटे यांचे अपहरण करणारा आणि पैसे ट्रान्सफर करणारा ट्रेडिंगच्या व्यवसायाशी संबंधित असावा, याचा उलगडा एलसीबीला झाला होता. त्यानुसार शेटे यांच्या जवळच्याच व्यक्तीने हा गुन्हा केला असावा, असा कयास होता. त्यानुसार तपास सुरु केला असता यामध्ये फलटण, कराड, इंचलकरंजी, कर्नाटक राज्यातील निपाणी येथील अट्टल गुन्हेगारांचा समावेश असल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी शिस्तबध्द तपास करत कराड, पुणे, इचलकरंजी आणि निपाणी येथून संशयितांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती यावेळी पोलिसांकडून देण्यात आली. त्यांच्यावर यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, अपहरण यासारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती अजय बन्सल यांनी यावेळी दिली.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ, पोलीस अंमलदार उत्तम दबडे, तानाजी माने, विश्वनाथ सपकाळ, सतीश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, संतोष पवार, संतोष सपकाळ, शरद बेबले, नितीन गोगावले, प्रवीण फडतरे, मंगेश महाडीक, लक्ष्मण जगधने, अर्जुन शिरतोडे, निलेश काटकर, मुनीर मुल्ला, अजित कर्णे, गणेश कापरे, स्वप्निल माने, विक्रम पिसाळ, मोहन पवार आदींनी सहभाग घेतला.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |