सातारा : वडूज पासून चौदा किलोमीटर अंतरावर असलेल्या येलमरवाडी, ता. खटाव येथील शेतमजूर असणाऱ्या हिराबाई दगडू जगताप (वय ७०, रा. एनकुळ, सध्या राहणार येलमरवाडी) यांचा रविवार दि. १२ रोजी रात्री साडे नऊ वाजण्याच्या दरम्यान मृतदेह सापडला. याबाबत सदर वृद्ध महिलेचा भाचा गौतम कृष्णा नलवडे यांनी वडूज पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केलेली आहे.
याबाबत वडूज पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रविवार दि. १२ रोजी रात्री साडे नऊ वाजण्याच्या दरम्यान येलमरवाडी येथील बाळकृष्ण पांडुरंग पोळ यांच्या घराशेजारी हिराबाई दगडू जगताप या मृतावस्थेत सापडल्या आहेत. त्याच्या डोक्याला जखम झाली होती. हा खुनाचा प्रकार असून त्याबद्दल अज्ञात आरोपी विरुद्ध फिर्यादीने तक्रार दिली आहे.
येलमरवाडी येथील पोलीस पाटील प्रशांत बागल यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी वडूज पोलीस ठाण्याला सदरच्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी जाऊन जागेचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला व शवविच्छेदन करण्यासाठी वडूज येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. सदर खून कोणी केला? का केला? याचा तपास वडूज पोलिस ठाण्याचे अधिकारी सपोनि मालोजीराव देशमुख करीत आहेत.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |