पुसेगाव : कोरोना तसेच अवकाळीच्या पार्श्वभूमीवर पुसेगाव (ता.खटाव) सह परिसरातील सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट पूर्ण कोलमडले असतानाच महावितरणचे अधिकारी कोणतीही पूर्वकल्पना न देता ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करत आहेत. सोमवारी दि.15 रोजी महावितरणचे अधिकारी बोलेरो गाडीतून पुसेगाव येथे विजतोडणीस जात असताना संतप्त शिवसैनिकांनी त्यांची गाडी फोडली. यावेळी गाडीत शैलेश राक्षे व इतर वसुली अधिकारी होते. तसेच कुठल्याही परिस्थितीत पूर्व सूचना दिल्याशिवाय वीज एकाही ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करू देणार नाही, असा इशारा शिवसैनिकांनी महावितरणच्या अधिकार्यांना दिला.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव म्हणाले, येथील नागरिक, व्यावसायिक, शेतकरी लॉकडाऊन तसेच अवकाळीच्या संकटातून सावरत असतानाच महावितरणने थकीत वीज ग्राहकांना कोणतीही पूर्व सूचना न देता अरेरावीची भाषा वापरात वीज तोडणीचा कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. महावितरणने ग्राहकांना वीज बिल भरण्यासाठी किमान दोन दिवसांची मुदत तरी द्यावी. तसेच गोर-गरीब जनतेवर अरेरावी व दमदाटीची भाषेचा वापर करू नये. ग्रामीण भागातील आर्थिक परिस्थिती पाहता राज्य सरकारने दुष्काळी भागातील वीज तोडणीबाबत वेगळा निकष लावून दुष्काळी भागातील जनतेला न्याय द्यावा, अशी मागणी देखील यावेळी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.
दरम्यान, महावितरणने आपल्या कारभारात सुधारणा न करता, तसेच पूर्वकल्पना न देता अरेरावीची भाषा वापरात एका जरी ग्राहकांची वीज तोडणी केली तर शिवसेना याचा तीव्र विरोध करेल, अशी माहिती जाधव यांनी यावेळी दिली.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |