सातारा : सातारा जिल्ह्यातील दोन सराईत मोटरसायकल चोरट्यांना दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये मोटार सायकल चोरी करणारे सराईत गुन्हेगार टोळी प्रमुख प्रल्हाद शिवाजी पवार वय 23 वर्षे, रा.गोपाळवस्ती अजंठा चौक, सातारा ता.जि.सातारा, शिवाजी मल्हारी बुटे,वय 38 वर्षे,रा. अजंठा चौक, सातारा ता.जि. सातारा (टोळी सदस्य) यांच्यावर सातारा जिल्ह्यामध्ये जबरी चोरी, मोटार सायकल चोरी, चोरीची मालमत्ता बाळगणे असे गुन्हे दाखल असल्याने सातारा शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी या टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 प्रमाणे सातारा जिल्ह्यातुन तडीपार करण्याबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांच्याकडे सादर केलेला होता.
प्रस्तावामध्ये यातील टोळीविरुध्द दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये त्यांना अटक करुनही ते जामीनावर बाहेर आल्यानंतर त्यांच्यावर वेळोवेळी करण्यात आलेल्या प्रतिबंधक कारवाईचा कोणताही परिणाम झाला नाही अगर त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांमध्ये सुधारणा झाली नाही. ते सातारा जिल्ह्यातील सर्वसामन्य लोकांच्या मोटार सायकली चोरी करुन इतर गुन्हे करीत होते. त्यांच्यावर कायद्याचा कोणताच धाक न राहिल्याने अशा गुन्हेगारांवर सर्वसामन्य जनतेमधून कडक कारवाई करण्याची मागणी होत होती.
हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांनी टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती घेवुन मोटार सायकल चोरी तसेच इतर गुन्हे करणारे प्रल्हाद शिवाजी पवार आणि शिवाजी मल्हारी बुट या टोळीस हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अन्वये सातारा जिल्ह्यातुन दोन वर्षाकरीता हद्दपारीचा आदेश पारीत केला आहे.
नोव्हेंबर 2022 पासुन 5 उपद्रवी टोळ्यांमधील 13 इसमांना तडीपार करण्यात आले आहे. भविष्यातही सातारा जिल्ह्यामधील सराईत गुन्हेगारांच्याविरुध्द हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करण्यात येणार आहेत.
हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक बापु बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस उपनिरीक्षक मधुकर गुरव, पोना प्रमोद सावंत, पो.कॉ.केतन शिदे, म.पो.कॉ.अनुराधा सणस यांनी योग्य पुरावा सादर केला.
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |