09:12pm | Nov 28, 2022 |
सातारा : आरएसएस या संघटनेकडून हिंदूत्व, हिंदूत्व म्हणून जाती-जातीत तेढ निर्माण करण्याचे काम केले जात आहे. आरएसएसकडून चुकीचा संदेश दिला जात आहे. केंद्रातील शासन हुकूमशाही पद्धतीने वागत आहे. या संघटनेचा जेथे उगम झाला आहे, तेथेच मी जन्मलो आहे. सध्याचे राज्य आणि केंद्र सरकार फक्त हिंदूत्व-हिंदूत्व करते आहे. तोच त्यांचा अजेंडा आहे. सत्तेवर येणे हाच त्यांचा धूर्त डाव आहे, तो आम्ही हाणून पाडू, असे मत राष्ट्रवादी सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. ग्यानबा म्हस्के यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी भवनात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. डॉ. ग्याबना म्हस्के म्हणाले, राष्ट्रवादी सेवा दलाच्यावतीने महाराष्ट्राचा दौरा दि.२३ पासून सुरु आहे. साताऱ्याच्या दौऱ्यावर आलो आहे. सेवा दलाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत राजेंद्र लावंघरे, सिमा जाधव, येवले, गोरखनाथ आदी उपस्थित होते. तीन चार महिन्यात सेवा दलाचे काम जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पोहचणार आहे.
महाराष्ट्रातील शासन हे घटनाबाह्य शासन असूनसुद्धा चुकीचे निर्णय घेत आहे. त्यांच्याकडून जनतेला कोणताही दिलासा देत नाही. महाराष्ट्रातून चांगले प्रोजेक्ट हे गुजरात आणि इतर राज्यात जात आहेत. यावर पवारसाहेबांनी भाष्य केले होते की, कुठे तरी चॉकलेट देण्याचे काम आहे. सध्या मला असे वाटते की, शिंदे फडणवीस सरकारने शेतकरी, शेतमजूर, तरुणांची माफी मागितली पाहिजे. बेरोजगार तरुणांची फरफट सुरु आहे. या गव्हमेंटचा मात्र एकच अजेंडा हिंदू आहे. ते जाती-जातीत भांडणे लावायचे काम करत आहे.
आरएसएसला तोंड देण्यासाठी राष्ट्रवादी सेवा दल काम करत आहे. येत्या एक महिन्यात कार्यकारणी उभी करण्यात येणार आहे. प्रत्येक जिह्याचा जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष एक दिवसाचे प्रशिक्षण होईल, विभागीय शिबिर होईल, यामागे आमचे कल्पना सेवा दलाचा कार्यकर्ता हा कर्मट असतो. आयाराम गयाराम नसतो. याच लोकसभेच्या वेळेला पवारसाहेबांनी भर पावसात भाषण दिले. त्याचे काय परिणाम झाले हे सर्वांनी पाहिले. सेवा दल हे सगळया जाती धर्माच्या लोकांना घेवून जाणारे संघटन आहे. भविष्यात आंदोलन करणार आहोत, असे सांगत त्यांनी रामदेवबाबा आणि राज्यपाल कोषारी यांच्यावरही टिप्पणी केली.
तडवळे सं. वाघोली येथील स्टोन क्रशर बंद करा |
मोबाईलची चोरी |
सुमारे साडेसात लाख रुपयांच्या दागिन्यांसह रोख रकमेची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा |
गाडीच्या बॅटऱ्यांची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
दुकानातील साहित्य चोरी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अमितवर फायरिंग करुन हल्लेखोरांनी चिरला होता त्याचा गळा |
महिलेच्या खून प्रकरणातील आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या |
शहर पोलिसांची चौकशी करा |
गणेश जयंती निमित्त साताऱ्यात उद्या विविध कार्यक्रम |
...तर सहकाराला कोणीही पराभूत करु शकणार नाही : विद्याधर अनास्कर |
कोयता गँगच्या दहशतीनंतर वाढे फाटा येथे गोळीबार |
घरफोडी करून 8 हजारांचे साहित्य चोरीस |
उपचारापुर्वी एकाचा मृत्यू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
दुकानातील साहित्य चोरी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अमितवर फायरिंग करुन हल्लेखोरांनी चिरला होता त्याचा गळा |
महिलेच्या खून प्रकरणातील आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या |
शहर पोलिसांची चौकशी करा |
गणेश जयंती निमित्त साताऱ्यात उद्या विविध कार्यक्रम |
...तर सहकाराला कोणीही पराभूत करु शकणार नाही : विद्याधर अनास्कर |
कोयता गँगच्या दहशतीनंतर वाढे फाटा येथे गोळीबार |
घरफोडी करून 8 हजारांचे साहित्य चोरीस |
उपचारापुर्वी एकाचा मृत्यू |
धक्काबुक्की केल्याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी दाखल |
दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून बॅटर्यांची चोरी |
शॉक लागून एकाचा मृत्यू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
8 कोटी 3 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी 19 जणांवर गुन्हा |