09:42pm | May 28, 2020 |
सातारा : येथील राधिका रस्त्यावर असलेल्या आपटे क्लिनिक समोर शस्त्राचा धाक दाखवून व मारहाण करुन मोबाईल चोरी करणाऱ्या साहील आयाज इनामदार, रा. केसरकर पेठ, सातारा व तेजस उर्फ भाऊ रमेश कदम रा. कोडोली, सातारा या सराईत चोरटयांना शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून गुन्हय़ात वापरलेली सिल्व्हर रंगाची बुलेट व दरोडयामध्ये चोरुन नेलला मोबाईल हॅन्डसेट असा एकूण ५० हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की दि. २१ मार्च रोजी संशयित आरोपींनी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास राधिका रोड येथील आपटे क्लिनीक समोर शस्त्राचा धाक दाखवून तक्रारदारास मारहाण करुन त्यांचा १० हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरुन नेला असल्याबाबतचा गुन्हा दि. २१ मार्च रोजी दाखल झाला आहे.
तपासामध्ये हा गुन्हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार साहील इनामदार व त्याचा साथीदार तेजस कदम यांनी केला असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांच्या शोधासाठी शाहुपूरी डी. बी. पथक मागावर होत. संशयित इसमाचा शोध घेत असताना गुरुवारी हे दोघेजण दुचाकीवरून भूविकास बँक चौकात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांना पकडण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी सूचना दिल्या होत्या.
डीबी पथकाने भूविकास बँक चौक परिसरात सापळा रचुन या दोघांना चौकात आले असताना झडप घालून ताब्यात घेतले. त्यांनी गुन्हयाची कबुली दिलेली असून त्यांनी गुन्हयात वापरलेली सिल्व्हर रंगाची बुलेट व दरोडयामध्ये चोरुन नेलला मोबाईल हॅन्डसेट पोलिसांनी हस्तगत केला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक निरीक्षक विशाल वायकर, संदीप शितोळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल हसन तडवी, पोलीस नाईक लैलेश फडतरे, अमित माने, स्वप्निल कुंभार, पंकज मोहिते सहभागी झाले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |