03:55pm | Jul 22, 2020 |
नवी दिल्ली: करोना व्हायरसने संपूर्ण जगाला त्रस्त करुन सोडले आहे. या व्हायरसची लागण झाल्यानंतर प्रत्येकामध्ये त्याचे वेगवेगळे परिणाम दिसून आले आहेत. काहींची प्रकृती गंभीर झाली, काहींमध्ये सौम्य लक्षणे दिसली तर काहींना हा आजार होऊन गेल्याचे कळले देखील नाही. दरम्यान, घराबाहेर कमी पण घरातल्याच सदस्यांकडून करोनाची लागण होण्याची शक्यता जास्त असल्याचा निष्कर्ष दक्षिण कोरियातील साथरोगशास्त्रज्ञांनी काढला आहे.
या व्हायरसमुळे आतापर्यंत जगभरात लाखो लोकांचे बळी गेले आहेत. त्यामुळे घराबाहेर पडताना करोनाची लागण होऊ नये, यासाठी आपण विशेष काळजी घेतो. यामध्ये तोंडाला मास्क बांधणे, सोशल डिस्टन्सिंगसारखे उपाय आहेत. पण आपण घराबाहेर पडताना जितकी काळजी घेतो, त्यापेक्षा किंबहुना जास्त काळजी घरी असताना घेण्याची आवश्यकता आहे.
दक्षिण कोरियात ही साथ सुरु झाल्यानंतर करोना पॉझिटिव्ह ठरलेले 5,706 रुग्ण आणि त्यांच्या संपर्कात आलेले 59 हजार जण यांचा अभ्यास करुन हा स्टडी रिपोर्ट बनवण्यात आला आहे. सेंटर फॉर डिजीस कंट्रोल अँड प्रिव्हएशनमध्ये 16 जूलैला हा रिपोर्ट प्रकाशित झाला. रॉयटर्सने हे वृत्त दिले आहे. या स्टडी रिपोर्टनुसार करोनाची लागण झालेल्या 100 रुग्णांपैकी फक्त दोघांना घराबाहेरील व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे करोना झाला होता.
वयोगटाचा विचार केल्यास दक्षिण कोरियात घरातच करोनाची लागण होण्याचे प्रमाण जास्त होते. किशोरवयीन युवक-युवती आणि 60 ते 70 वयोगटातील नागरिकांना प्रामुख्याने करोनाची लागण झाली. हे दोन्ही वयोगट कुटुंबीयांच्या जास्त संपर्कात असावेत. त्यामुळे या वयोगटांना जास्त सुरक्षेची आवश्यकता आहे असे जीआँग यांनी सांगितले. ते कोरियन सेंटर फॉर डिजीस कंट्रोल अँड प्रिव्हएशनचे संचालक आहेत.
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |

ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |