08:58pm | Apr 05, 2021 |
सातारा : कुठरे-ढेबेवाडी (ता.पाटण) येथील लाचखोर मंडल अधिकारी प्रविण शिंदे यांनी आपल्या कार्यकाळात मिळवलेल्या बिहिशोबी मालमत्तेची सखोर चौकशी करण्यात यावी, त्याचबरोबर 2018 मध्ये पाटण येथील तहसीलदार श्रीराम हरि भोसले यांच्या भ्रष्ट कारभाराची व त्यांच्या बेहिशोबी मालमत्तेची सखोल चौकशी करून त्यांची चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी गुढे (ता.पाटण) येथील सुरेश विलास कदम, सौ.सीमा सुरेश कदम यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ बेमुदत आमरण उपोषण करत जिल्हाधिकारी यांनी निवेदन देवून मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, आमचा शेती हा एकमेव व्यवसाय असून शेतीसह भाडेतत्वावरील काम करण्यासाठी आम्ही कर्ज काढून जेसीबी घेतला आहे. दि.17 मार्च रोजी जेसीबीला लागलेला कचरा, धुळ साफ करण्यासाठी तसेच पाडव्यादिवशी पूजन करण्यासाठी जेसीबी शेतालगत असणार्या वांग नदीपात्राजवळ नेवून स्वच्छ केला. त्याचवेळी मंडलाधिकारी प्रविण शिंदे यांनी सुरेश विलास कदम यांची फसवणूक करून कोर्या कागदावर सह्या घेतल्या. तुमचा जेसीबी नदीपात्रात आला त्याकरिता सह्या करा असे सांगितले. प्रत्यक्षात तो जेसीबी जबरदस्तीने ढेबेवाडी पोलिस ठाण्यात नेवून जप्त करण्यात आल्याचे सांगितले. तसेच तुमच्यावर गौणखनिज अनाधिकृत उत्खनन बाबत केस केली असल्याचे सांगत प्रविण शिंदे यांनी 20 हजार रूपयांची मागणी केली.
नाईलाजास्तव त्यांना 20 हजार रूपयांची लाच दिली मात्र शिंदे यांनी जेसीबीला मोठा दंड होतो. तुम्ही 50 हजार रूपये द्या असे सांगून ते दिल्याने तहसील राम हरि भोसले यांना सांगून आम्हाला 7 लाख 50 हजार रूपयांचा दंड केला. तद्नंतर प्रविण शिंदे यांनी बनाव करून खोटा ट्रॅक्टर व मालक उभा करून आमच्यावर केस केली. आमचे मानसिक खच्चीकरण झाले असून आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
त्यामुळे वरील दोघांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करून त्यांची नार्को चाचणी करावी, यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आमरण उपोषण करित असून प्रसंगी आत्मदहनही करणार असल्याचे म्हटले आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |