सातारा : जांब, ता.खटाव येथील विश्वासराव शिंदे व कैलास शिंदे यांच्या गोठ्यात शेजारी, शेजारी असलेल्या गंजीला अचानक लागलेल्या आगीत दोन हजार कडबा व शेतीपूरक साहित्य जळून खाक झाला. सुदैवाने या आगीत जीवीत हानी झाली नाही.
याबाबतची मिळालेली माहिती अशी, जांब येथील विठोबाचा माळ या ठिकाणी विश्वास शिंदे व कैलास शिंदे या भावांनी शेजारी, शेजारी नुकत्याच गंजी लावून ठेवल्या होत्या. ज्वारीची सुगी संपल्यानंतर येथील शेतकरी पावसाळ्यात जनावरांना ज्वारीच्या कडबा व गवताच्या गंजी लावून ठेवतात. सोमवारी दुपारच्या प्रहरात शिंदे कुटुंबातील महिलांना गंजीतून धुर निघालेला दिसला. त्यांनी लगेच आरडाओरडा करून आजूबाजूला असलेल्या शेतकर्यांना मदतीला बोलावून घेतले. आसपास असलेल्या शेतकर्यांनीही हाक कानावर पडताच त्वरेने घटनास्थळी धाव घेऊन आजूबाजूला असलेल्या गोठ्यातून हाताला लागेल ते भांडे घेऊन पाणी आणण्यासाठी नजीकच्या हापशीकडे धाव घेतली. तथापि, तोपर्यंत आगीने रौद्र रुप धारण केले होते. एव्हाना दोन्हीही गंजीने चांगलाच पेट घेतला होता. सुदैवाची गोष्ट ही की, तोपर्यंत चांगलाच जमाव गोळा झाला. त्यांच्या मदतीने शेजारच्या वस्तीत असलेल्या बोअरला पाईप जोडून गंजीवर पाण्याचा फवारा सुरू केला त्यामुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले. अन्यथा आजूबाजूच्या वस्तीत आग पसरून मोठा अनर्थ घडला असता.
आगीचे कारण समजू शकले नाही. मात्र आगीत वैरणीचे मोठे नुकसान झाले असून सध्या जनावरांना उन्हाळ्याच्या दिवसात खायला एकही पेंडी शिल्लक नसल्यामुळे जनावरांना खायला काय घालायचे? हा प्रश्न शिंदे कुटुंबियांना पडला आहे. झालेल्या नुकसानीचा रीतसर पंचनामा करून शासनाने मदत करावी, अशी मागणी शिंदे कुटुंबियांनी केली आहे.
मौजे सासकलचे ग्रामसेवक अंगराज जाधव यांच्या कार्यपध्दतीवर ग्रामस्थ नाराज |
मंगळवार पेठ बोगद्यातील सराईत गुंड सातारा जिल्ह्यातून एक वर्षाकरिता तडीपार |
राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदी समिंद्रा जाधव |
कधी जाणार हा कोरोना, लोकप्रतिनिधी तुम्ही काय करत आहात? |
सालपे घाटातील दरोड्याचा गुन्हा 24 तासांत उघड |
सक्षम राष्ट्रासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जतन करणे गरजेचे : सागर भोगावकर |
जिल्ह्यातील प्रसारमाध्यमातील सर्व घटकांना संचारबंदीत मुभा |
डॉ. आंबेडकरांचा शैक्षणिक वारसा जपुया : अरुण जावळे |
पालकमंत्र्यांच्या हस्ते उंब्रज येथे रक्तदान शिबिराचे उद्घाटन |
लस सुरक्षित असून सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे: पालकमंत्री बाळासाहेब पाटील |
जिल्ह्यातील 1100 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित |
सातार्यात महामानवाला सर्व जातीधर्म व चिमुकल्यांचेही अभिवादन |
यवतेश्वरच्या खोल दरीत युवतीचा मृतदेह आढळल्याने खळबळ |
कराड येथे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिन अभिवादन केले |
जिल्हाधिकारी कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन |

बाधित वाढल्याने पुसेगाव परिसरात चिंतेचे वातावरण |
क्रेन-दुचाकी अपघातात एक ठार, एक जखमी |
मारामारीच्या गुन्ह्यातील सराईत गुंडास अटक |
जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
घरखर्चाला पैसे देण्याच्या कारणातून मुलाची वडिलांना मारहाण |