01:51pm | Feb 07, 2021 |
जोशीमठ, उत्तराखंड : उत्तराखंडच्या जोशीमठाच्या रेणी भागातील ऋषिगंगा प्रोजेक्टवर हिमकडा कोसळल्यानंतर प्रकल्पाला मोठे नुकसान झाले आहे. तपोवनमध्ये चमोली हायड्रो पॉवर प्रोजेक्टच्या बांधाला यामुळे फटका बसला आहे. यामुळे, जोशीमठ भागात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण होवून अचानक आलेल्या पाण्याच्या लाटेत अनेक स्थानिक रहिवासी वाहून गेल्याचंही समजतंय.
चमोली जिल्ह्यातील तपोवन भागातील रेणी गावात एका वीज प्रकल्पाजवळ अचानक हिमस्खलन झाल्यानंतर धौलीगंगा नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढली. धौलीगंगा नदीच्या किनार्यावर वसलेल्या गावांत राहणार्या रहिवाशांना तत्काळ बाहेर काढण्याचे निर्देश चमोली जिल्हाधिकार्यांकडून देण्यात आले आहेत. घटनेची सूचना मिळताच प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. बचावकार्य सुरू आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.
धौलीगंगा नदीच्या प्रवाहात वाढ झाल्यानंतर गंगेच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हरिद्वारपर्यंत अलर्ट जारी करण्यात आला आहे. जोशी मठाच्या नुकसानीबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र, हिमकडा कोसळल्यानंतर धौलीगंगा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. हिमकडा कोसळल्यानंतर पाण्याचा मोठा प्रवाह नदीतील धरणात येताना दिसत आहे. पाण्याच्या तडाख्यात नदीवरील दोन पुल वाहून गेले असून, एसडीआरएफने मदत कार्य सुरू केले आहे.
राज्य सरकारनं अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी जोशी मठाजवळ एक हेलिकॉप्टर पाठवलं आहे. त्याचबरोबर केंद्राकडे एनडीआरएफच्या तुकड्या पाठवण्याची मागणी केली आहे. या घटनेत पाण्यामुळे नदीकाठावरील घरांना फटका बसला असून, अनेकजण वाहून गेल्याचं वृत्त आहे.
ऋषीगंगाबरोबरच अलकनंदा नदीकाठी राहणार्या नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. त्याचबरोबर अलकनंदा परिसरात अडकलेल्या नागरिकांनाही सुरक्षितपणे हलवण्यात आलं आहे. अलकनंदा नदीला पूर येऊन नये, खबरदारीचा उपाय म्हणून भगीरथी नदीचा प्रवाह बंद करण्यात आला असून, एसडीआरएफला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी ही माहिती दिली आहे. रावत यांनीही घटनास्थळाकडे धाव घेतली आहे.
8 मार्च पासून मोठ्या प्रमाणात कोविड-19 लसीकरण कार्यक्रम जिल्ह्यातील शासकीय आणि मोठ्या रुग्णालयात सुरु |
गुंड गज्या मारणेला सोपवले पुणे ग्रामीणच्या ताब्यात |
मनसे नेते राज ठाकरे हे मास्कबाबत मुख्यमंत्र्यांचा आदेश मानत नाहीत : रामदास आठवले |
कोरोना लसीकरणासाठी जिल्ह्यातील 65 आरोग्य केंद्र सज्ज |
जिल्ह्यातील दोन कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |
अनिकेत शिंदे याची लोकसेवा आयोगा मार्फत लेफ्टनंट पदी निवड |
अश्लील वर्तन करणाऱ्याला दोन वर्ष सश्रम कारावास |
अत्याचार प्रकरणी बाळू मदने याला सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा |
खुनाचा प्रयत्न करणाऱ्या एकाला ३ महिने साध्या कैदेची शिक्षा |
आरोग्य विभागाची रखडलेली कामे मार्गी लावणार : डॉ. संजोग कदम |
मेढ्यात झाला गुंड गज्या मारणे जेरबंद |
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
एटीएम कार्ड चोरून 60 हजारांच्या फसवणूक प्रकरणी चारजणांविरोधात गुन्हा |
मोळाचा ओढा परिसरातील जुगार अड्डयावर छापा |
दुचाकीची चोरी |
अनिकेत शिंदे याची लोकसेवा आयोगा मार्फत लेफ्टनंट पदी निवड |
अश्लील वर्तन करणाऱ्याला दोन वर्ष सश्रम कारावास |
अत्याचार प्रकरणी बाळू मदने याला सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा |
खुनाचा प्रयत्न करणाऱ्या एकाला ३ महिने साध्या कैदेची शिक्षा |
आरोग्य विभागाची रखडलेली कामे मार्गी लावणार : डॉ. संजोग कदम |
मेढ्यात झाला गुंड गज्या मारणे जेरबंद |
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
एटीएम कार्ड चोरून 60 हजारांच्या फसवणूक प्रकरणी चारजणांविरोधात गुन्हा |
मोळाचा ओढा परिसरातील जुगार अड्डयावर छापा |
दुचाकीची चोरी |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हॉटेलच्या मालकावर गुन्हा |
जिल्ह्यात चार ठिकाणी दारू अड्ड्यांवर छापा |
किरकोळ वादातून एकीने केले विषारी औषध प्राशन |
एकाची गळफास लावून आत्महत्या |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकावर गुन्हा |