10:59am | Nov 29, 2020 |
सातारा : बाटलीमध्ये पेट्रोल देऊ नये अशा सक्त सूचना पोलीसांनी करूनही बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील पेट्रोल पंपावरून बिनधास्तपणे बाटलीमधून पेट्रोल दिले जात आहे. हा पेट्रोलपंप एका राजकीय पक्षाच्या पदाधिकारी चालवत असल्यामुळे अशा घटनांकडे पोलिसांनी अक्षम्य दुर्लक्ष केले आहे की काय, असा प्रश्न त्यामुळे उपस्थित होऊ लागला आहे. दरम्यान, संबंधित पेट्रोलपंप चालकावर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होऊ लागली आहे.
गेल्यावर्षी पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गा लगत असणाऱ्या सेवा रस्त्या नजिकच्या झाडीमध्ये पिरवाडी (सातारा) परिसरामध्ये पेट्रोल अंगावर टाकून एका युवकाचा जाळून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेनंतर सातारा जिल्हा पोलीस दलाने सातारा शहर व परिसरातील सर्व पेट्रोल पंप चालकांना बिसलरीच्या बाटलीत पेट्रोल न देण्याच्या सक्त घटना केल्या होत्या. बिसलरी बाटलीमध्ये पेट्रोल दिले जाणार नाही असे कागदी फलक पेट्रोल पंपावर लावण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याची अंमलबजावणी तात्काळ सातारा शहर व परिसरातील सर्व पेट्रोल पंप चालकांनी केली. मात्र काही पेट्रोल पंप चालकांनी पुन्हा एकदा येरे माझ्या मागल्या असे म्हणत बिसलरीमध्ये पेट्रोल देण्यास सुरुवात केली आहे.
सातारा येथील बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी गेले अनेक वर्ष पेट्रोल पंप चालवत आहे. अलीकडच्या काळात जिल्हा पोलिस दलाच्या सूचना बासनात बांधून या पेट्रोल पंपावरून मोठ्या प्रमाणावर बिसलेरीच्या बाटलीमध्ये पेट्रोल देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे सातारा शहर परिसरात पुन्हा एकदा गुन्हेगारी घटनांना आमंत्रण मिळण्याची शक्यता निर्माण झाली असल्यामुळे पोलिसांनी संबंधित पेट्रोल पंप चालकावर कडक कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होऊ लागली आहे.
सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची गरज
सातारा शहर व परिसरातील बहुतांशी पेट्रोल पंप चालकांनी पंपावर सीसीटीव्ही बसविले आहेत. संबंधित पेट्रोल पंपावरील सीसीटीव्हीचे फुटेज तपासल्यास दूध का दूध आणि पाणी का पाणी होण्यास मदत होईल.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |