02:49pm | Dec 31, 2020 |
कोरेगाव : कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान लोकप्रतिनिधीने माझ्या नावाची जी बदनामी सुरू केली आहे. ती अत्यंत चुकीची व दिशाभूल करणारी आहे. मी त्यांना काय मागितले? काय नाही? हे त्यांनी माझ्या समोर येऊन चर्चा करावी. कुजबुज करून एखाद्या कार्यकर्त्याला, नेत्याला बदनाम करण्याची आपल्या पक्षाची परंपरा आहे. हिम्मत असेल तर त्यांनी मझ्यासमोर येऊन चर्चा करावी. विधानसभा निवडणुकीत मी तुमच्यासाठी काय केले? कित्ती खर्च केला? याबदल्यात मी तुमच्याकडे काय मागितले? तुम्ही मला काय दिले आहे? दिल्या-घेतल्याचा हिशोब आपण ल्हासुर्णेत पारावर बसून करू, असे आव्हान प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस रमेश उबाळे यांनी आ.महेश शिंदे यांना दिले आहे. पत्रकात आ. महेश शिंदे यांच्या नावाचा उल्लेख टाळला आहे.
रमेश उबाळे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, मी तुमच्यावर प्रामाणिकपणे प्रेम करणारा सच्च्या कार्यकर्ता होतो. अगदी मोठ्या भावाप्रमाणे आपणावर प्रेम केले. मी आपला उल्लेख दादा म्हणून करत होतो. विधानसभा निवडणुकीत मी सुमारे तीन वर्षे बेभान होऊन तुमचा प्रचार केला आहे. तुम्ही माझ्या घरी येत होता. मी तुमच्या घरी येत होतो. आपला कौटुंबिक जिव्हाळा निर्माण झाला होता. हा जिव्हाळा टिकवण्याची माझी जशी जबाबदारी होती, तशी तुमचीही होती. निवडणूकीपूर्वी माझ्या आईच्या हातची चटणीही तुम्हाला गोड लागत होती. आईच्या हाताची चटणी खूपच चविष्ठ आहे. रमेश मला ही चटणी बांधून दे घरी जेवताना खाईन असे म्हणत होतात. परंतु निवडणूकीनंतर आपण सरड्यासारखा रंग पालटला. जवळ असलेला रमेश दूरचा वाटू लागला. आपल्या पक्षाच्या परंपरेप्रमाणे माझ्याविषयी कार्यकर्त्यांमध्ये वाईट मते व्यक्त करत कुजबुज करून बदनामी सुरू केली. तरीही मी आपणाकडे कानाडोळा केला. परंतु आपण थांबायलाच तयार नव्हता. एकवेळ मला, ‘रमेश तू राजकारण सोडून दे आणि तुझा व्यवसाय बघ.’ असे म्हणाला असता तर मी मोठ्या भावाचा शब्द मानून क्षणात राजकारण सोडून दिले असते. बदनाम करून रमेश उबळेला संपवायचे. हा तुमचा राजकीय डाव होता. परंतू आम्हीही डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आहोत. स्वाभिमान आमच्या रक्ताच्या थेंबा-थेंबात आहे. आम्ही असेच संपणारे नाही आहोत हे तुम्हाला दाखवून देऊ.
तुमच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यावेळी मी त्या पक्षात प्रवेश केला. पक्षाचा पदाधिकारी झालो. तुमचे नेतृत्व तीन साडे तीन वर्षे अनुभवले आमदार होण्यापूर्वी तसेच आमदार झाल्यानंतरचे अनुभूती मला तुमच्याकडून मिळाली.दरम्यानच्या कालावधीत आपण माजी जलसंपदा मंत्री आ.शशिकांत शिंदे यांची वाढदिवसानिमित्त भेट घेतली. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. नेतृत्व, नेता कसा असतो याची चुणूक मला त्यांच्या बोलण्यातून जाणवली. अखेर मी माझे कुटुंबाशी, हितचिंतक मित्रांबरोबर चर्चा करून राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. आ.शशिकांत शिंदे साहेबांनी मला भरभरून दिले आहे. माझ्या नावाची प्रसिद्धी, चर्चा संपूर्ण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात सुरू झाल्याने आपणास पुन्हा लहान भावाची कुठेतरी जेलसी निर्माण झाल्याने तुम्ही माझ्या नावाची पुन्हा बदनामी सुरू केली आहे. म्हणून तुम्ही कधीही, कितीही वाजता ल्हासुर्णेत मला बोलवा. मी विधानसभा निवडणुकीत तुमच्यासाठी काय केले? स्वतःच्या खिशातून कित्ती खर्च केला आहे. निवडणूकीनंतर मी तुमच्याकडे काय मागितले? तुम्ही मला काय दिले आहे? याचा हिशोब एकाच पारावर तुम्ही म्हणालात तर ग्रामस्थांसमोर अन्यथा दोघेच बसून करू या. परंतू कार्यकर्त्यांच्या कानात कुजबूज करून मला बदनाम करू नका. अन्यथा मलाही जशास तसे उत्तर द्यावे लागेल.
आमचे उबाळे घराणे देणारे आहे. घेणारे नाही. माझ्या आजोबांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी मदत दिली होती. हा आमच्या घराण्याचा इतिहास आहे. तुम्ही काय मला मागितले-मागितले म्हणून चर्चा करता तुम्हालाच आणखी काय मदत पाहिजे असेल तर तुम्ही माझ्याकडे जरूर या. माझ्या वडिलांनी कॅन्सरसारखा आजार आहे. आईला बी.पी.चा त्रास आहे. आशा परिस्थितीत माझ्या वृद्ध माता- पित्याना बाहेर काढून पाहुणे, नातेवाईकांंमध्ये प्रचारासाठी प्रचाराला पाठविले. माझी करत असलेली बदनामी त्यांनाही सहन होत नाही म्हणून दादा तुम्ही माझ्या आईच्या हातच्या खाल्लेल्या चटणी भाकरीला तरी जागा, असा टोलाही रमेश उबाळे यांनी आ.महेश शिंदे यांचे नाव न घेता पत्रकात लगावला आहे.
कोण फ्रॉड कोण प्रामाणिक हे काळ ठरवेल
रमेश उबाळे फ्रॉड आहे, असे म्हणून माझी बदनामी करण्याचे काम तुमच्याकडून सुरू आहे. परंतू मी फ्रॉड आहे की प्रामाणिक. हे तुमच्या निकटवर्तीय मित्रांना, तुमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी माहितीच आहे. तुम्ही माझी कितीही बदनामी केली तरी तुम्ही माझ्या नावाचा प्रचार करत आहात, असे मी समजतो आणि कोण फ्रॉड आणि कोण प्रामाणिक आहे? हे काळच ठरवेल, असेही रमेश उबाळे यांनी पत्रकात म्हटले आहे.
महाराष्ट्राचा लोकनेता दिनदर्शिका प्रसिद्ध करणार
‘महाराष्ट्राचा लोकनेता आ.शशिकांत शिंदे’ नवीन वर्षाची दिनदर्शिका बालाजी कन्स्ट्रक्शनच्या वतीने लवकरच नवीन वर्षात प्रसिद्ध होणार असून या दिनदर्शिकेच्या सुमारे 10 हजार प्रती कोरेगाव विधानसभा मतदारसंघात वाटणार आहे. मागणी वाढल्यास या दिनदर्शिकेची आणखी एक आवृत्ती काढण्यात येईल, असेही रमेश उबाळे म्हणाले.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |