08:21pm | Jan 22, 2022 |
सातारा : भ्रष्टाचाराची बातमी का लावतो? म्हणत पत्रकार सुमित चोरमले यांना धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुंड नंदकुमार कचरेवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या सूचना अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांना दिल्या. याप्रकरणी सातारा जिल्हा पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी अप्पर पोलीस अधिक्षक अजित बोऱ्हाडे यांची भेट घेतली होती.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष हरीष पाटणे म्हणाले कि, जिल्ह्यातील कोणत्याही पत्रकाराच्या केसाला धक्का लागू देणार नाही. पत्रकारांवर हल्ला झाल्यास हल्लेखोरांविरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होणार आहे. सातारा जिल्हा पत्रकार संघ हा नेहमीच पत्रकारांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, मात्र पत्रकारांच्या हक्कावर कोणी गदा आणण्याचा प्रयत्न केल्यास त्याला जशास तसे उत्तर देऊ, असे हरिष पाटणे म्हणाले.
शहराध्यक्ष विनोद कुलकर्णी म्हणाले कि, पत्रकाराला जाणून बुजून धमकी देण्याचा प्रकार या साताऱ्यात खपवून घेतला जाणार नाही, मग तो कोणीही असू. त्याच्यावर १६ गुन्हे असू नाहीतर २० असू. पत्रकार बंधू हे एखाद्याला न्याय देण्यासाठी काम करत असतात. मात्र त्यांना अशी धमकी मिळत असेल तर त्यांना सातारी हिसका दाखवू, असे विनोद कुलकर्णी म्हणाले.
सातारा जिल्ह्यातील पत्रकारांवर यापुढे गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून आरेरावी किंवा धमकावण्याचे प्रकार झाल्यास त्या प्रवृत्तीला ठेचून काढल्याशिवाय सातारा जिल्हा पत्रकार संघ शांत राहणार नाही, असे घडल्यास यापुढे संबंधितांच्या घरावर दंडुका मोर्चा काढू, असा इशारा सचिव दीपक प्रभावळकर यांनी बोलताना दिला.
यावेळी कार्याध्यक्ष शरद काटकर पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती सदस्य सुजित आंबेकर, मराठी पत्रकार परिषद सोशल मीडिया अध्यक्ष संतोष (सनी) शिंदे, प्रसिध्दी प्रमुख दीपक शिंदे, प्रकाश शिंदे, संतोष नलावडे, प्रशांत जगताप, महाराष्ट्र न्यूजचे संपादक सचिन बर्गे, कार्यकारी संपादक चंद्रकांत पवार, समाधान हेंद्रे, तबरेज बागवान, गुरुनाथ जाधव, किरण मोहिते,प्रतीक भद्रे,अमित वाघमारे, सोहेल मुलाणी यांच्यासह सातारा शहरातील सर्व पत्रकार उपस्थित होते.
राष्ट्रवादीचे नगरसेवक भारत बोडरे यांनी लपवले तिसरे अपत्य |
सदरबझार येथून २३ हजार रुपयांचा ऐवज लंपास |
सराईत चोरट्याकडून दुचाकी चोरीचा गुन्हा उघडकीस |
सातारा जिल्ह्यातील 440 'उमेद' समूहांना 7 कोटी कर्ज वाटप |
काळाची पाऊले ओळखून उद्योग विश्वाकडे चला : हेमलता भोसले |
नांदगाव येथे वनवा लावणाऱ्यास पाच हजार रुपये दंड |
साताऱ्यात सराफी पेढी मधून महिलेचे दागिने लांबविले |
विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सासु-सासर्यांवर गुन्हा |
कांगा कॉलनी मध्ये वृद्धाचा अचानक मृत्यू |
सातारा शहराला मान्सूनपूर्व पावसाने झोडपले |
ऐतिहासिक लाल महालात गाण्याचे चित्रीकरण करणाऱ्यांवर कारवाई करा |
राज्यात ओबीसी आरक्षण लागु करण्याची मागणी |
पुण्यात आढळलेली शिवकालीन नाणी साताऱ्यातील संग्रहालयात |
स्वामी समर्थ गुरुपीठ सेवेकऱ्यांची पोलिस अधीक्षकांकडे तक्रार |
सातारा शहरातील 70 ओढ्यांच्या सफाईचे काम पूर्ण |

भविष्यकाळात भारत विश्वगुरू होऊन जगावर सत्ता गाजवेल |
देशसेवा करताना जावलीच्या सुपुत्राला वीरमरण |
जगभरात मंकीपॉक्सचे थैमान : भारतातही सरकार 'अलर्ट मोड'वर |
देशसेवा करताना जावलीच्या सुपुत्राला वीरमरण |
विजेचा शॉक लागून 23 वर्षीय युवकासह म्हैशीचा मृत्यू |