सातारा : आज दि. 23 रोजी रात्री उशिरा पोवई नाक्यावर कोयता नाचवून दहशत माजविणार्या पाचजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोवई नाक्याजवळील सयाजीराव हायस्कूल समोर काही युवक हातात कोयता घेवून तो नाचवित असल्याची माहिती सातारा शहर पोलिसांना मिळाली. त्यानुसार सातारा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना तत्काळ ताब्यात घेतले, तर पळून जाणार्या इतर तिघांना पोलिसांनी मोठ्या शिताफीने पोवई नाक्यावर जेरबंद केले. सातारा शहरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणार्या पाचही जणांना पोलिसांनी पोलीस ठाण्यात नेवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती पोलीस ठाण्यातून देण्यात आली. गुन्हा दाखल झाल्यानंतरच संबंधित संशयित कोयता गँगमधील युवकांची नावे निष्पन्न होणार आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पुण्यातील एका उपनगरामध्ये कोयता गँगमधील काही गुंडांनी धुमाकूळ घालून हातगाडीधारक तसेच दुकानांचे कोयता हातात घेत प्रचंड नुकसान करुन दहशत माजवली होती. परंतू पुणे शहर पोलीस दलातील दोघा कर्मचार्यांनी या दहशत माजवणार्या या दोघांना पोलिसी खाक्या दाखवून त्यांच्या गठड्या आवळल्या होत्या. या घटनेची चर्चा संपूर्ण राज्यभरात झाली होती. ही घटना ताजी असतानाच अशाच प्रकारचे लोण पुन्हा सातार्यात आल्याने सातार्यातही कोयता गँग सक्रीय झाली की काय? असा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे. परंतू सातारा शहर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून माहिती मिळताच काही मिनिटातच संशयित कोयता गँगमधील पाचजणांना तत्काळ ताब्यात घेत पुण्यातील थेरं सातार्यात चालणार नाहीत, असा इशाराही या कारवाईच्या निमित्ताने दिलेला आहे. रात्री उशिरापर्यंत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
या कारवाईमध्ये सातारा शहर पोलीस दलातील संतोष शेलार, अभिजीत यादव, विनायक मनवी व वाहतूक शाखेच्या विशाल मोरे यांनी धैर्य दाखवत संबंधितांना जेरबंद केल्याने त्यांचेही पोलीस दलातून कौतुक होत आहे.
तडवळे सं. वाघोली येथील स्टोन क्रशर बंद करा |
मोबाईलची चोरी |
सुमारे साडेसात लाख रुपयांच्या दागिन्यांसह रोख रकमेची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा |
गाडीच्या बॅटऱ्यांची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
दुकानातील साहित्य चोरी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अमितवर फायरिंग करुन हल्लेखोरांनी चिरला होता त्याचा गळा |
महिलेच्या खून प्रकरणातील आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या |
शहर पोलिसांची चौकशी करा |
गणेश जयंती निमित्त साताऱ्यात उद्या विविध कार्यक्रम |
...तर सहकाराला कोणीही पराभूत करु शकणार नाही : विद्याधर अनास्कर |
कोयता गँगच्या दहशतीनंतर वाढे फाटा येथे गोळीबार |
घरफोडी करून 8 हजारांचे साहित्य चोरीस |
उपचारापुर्वी एकाचा मृत्यू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
दुकानातील साहित्य चोरी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अमितवर फायरिंग करुन हल्लेखोरांनी चिरला होता त्याचा गळा |
महिलेच्या खून प्रकरणातील आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या |
शहर पोलिसांची चौकशी करा |
गणेश जयंती निमित्त साताऱ्यात उद्या विविध कार्यक्रम |
...तर सहकाराला कोणीही पराभूत करु शकणार नाही : विद्याधर अनास्कर |
कोयता गँगच्या दहशतीनंतर वाढे फाटा येथे गोळीबार |
घरफोडी करून 8 हजारांचे साहित्य चोरीस |
उपचारापुर्वी एकाचा मृत्यू |
धक्काबुक्की केल्याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी दाखल |
दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून बॅटर्यांची चोरी |
शॉक लागून एकाचा मृत्यू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
8 कोटी 3 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी 19 जणांवर गुन्हा |