02:50pm | Oct 27, 2020 |
अजित जगताप
सातारा: पत्रकारिता करीत सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे पत्रकार तुषार तपासे यांनी सातारा शहरात मोबाईल केअर सेल्स व सर्व्हिस सेंटरची उभारणी केली आहे. ती नक्कीच उपयुक्त ठरेल, अशा शब्दात छत्रपती शिवराय यांचे तेरावे वंशज व भाजपचे खा.श्री.छ. उदयनराजे भोसले यांनी उद्घाटन कार्यक्रमात सहभागी होऊन केले आहे.
सातारा शहरातील प्रकाश लॉज समोरील दालनात उभारण्यात आलेल्या या मोबाईल शॉपीमध्ये सॅमसंग, रेडमी, विओ, रिअलमी, ओपो आणि मायक्रोमॅक्स या सर्व कंपन्यांचे मोबाईल त्याचबरोबर अकॅसेसेरीज आणि दुरुस्ती देखील याच ठिकाणी केली जाणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास असलेले टेकनिशयनमार्फत माफक दरात मोबाईल दुरुस्ती केली जाणार आहे.
या शॉपीचे उद्घाटन खा. उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि उद्योजक राजेंद्र चोरगे यांच्या हस्ते करण्यात आले. राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, सातार्याच्या नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, नगरसेवक बाळासाहेब खंदारे, अविनाश कदम तसेच दलित सेना प्रदेश सरचिटणीस प्रेमानंद जगताप यांनी देखील या शॉपीला भेट देत शुभेच्छा दिल्या.
जेष्ठ पत्रकार अजित जगताप, हरीश पाटणे, विनोद कुलकर्णी, राहुल तपासे, सुजित आंबेकर, डॅनियल खुडे, संतोष नलावडे, प्रशांत जगताप, किरण मोहिते यांनी देखील तुषार तपासे यांना पत्रकार तुषार तपासे यांच्या या नवीन उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. पत्रकारिता करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग होत आहे. ती एक काळाची गरज बनली आहे.
सध्या सोशल मीडियावर अनेक पोष्ट तयार केल्या जातात. व्हायरल करून चांगल्या गोष्टी लक्षात आणून दिल्या जातात. त्यामुळे मोबाईल ही जीवनावश्यक वस्तू बनली आहे. तिची काळजी घेणे आवश्यक आहे तसेच नेहमी अपडेट राहण्यासाठी नवीन मोबाईल ची गरज आहे. त्याची ही पूर्तता या शॉपीमध्ये होत आहे. याचे समाधान ग्राहकांना आकर्षित करीत आहे
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |