01:18pm | Jan 09, 2021 |
(प्रकाश राजेघाटगे)
बुध: एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी गुडघ्यावर बसून आपल्या प्रेमाचा इजहार करणारा नायक, एखाद्या कॅफेमध्ये कॉफीचा आस्वाद घेणारे नायक-नायिका... हे सर्व चित्रपटामध्ये बघत असताना आपल्या बाबतीमध्येही असेच काहीतरी घडावे, असे विचार अनेक तरूण - तरूणींच्या मनात सहज डोकावून जातात. काही वर्षापूर्वी स्वप्नवत वाटणारी ही गोष्ट आता ‘प्री वेंडिग’ फोटोशूटमधून सहज शक्य होऊ लागली आहे. आजच्या बदलत्या जमान्यातील टेक्नोसॅव्ही असणार्या तरूणाईमध्ये ‘प्री वेडिंग’ फोटोशूटची क्रेझ वाढत आहे. त्यामुळेच आता बहुतांश लग्नसोहळ्यामध्ये अथवा लग्नानंतर दिल्या जाणार्या रिसेप्शनमध्ये वधूवराने केलेले ‘प्री वेडिंगचे फोटो, व्हिडीओ मोठ्या स्क्रिनवर दिसू लागले आहेत.
घरामध्ये लग्नसोहळा म्हटलं की, सगळ्यात महत्वाचे असतात ते म्हणजे फोटो. अगदी साखरपुडा, हळदीच्या कार्यक्रमापासून ते थेट लग्नाचे रिसेप्शन होईपर्यंत प्रत्येक क्षणाचे फोटो टिपले जातात. मात्र आता केवळ लग्नाच्या कार्यक्रमापुरतेच फोटोशूट मर्यादित न राहता ‘प्री वेडिंग फोटोशूटची क्रेझ तरूणाईमध्ये वाढताना दिसू लागली आहे. लग्नाचे फोटोशूट करण्यासोबतच लग्नाच्या अगोदर चित्रपटातील नायक - नायिका सारखे हटके फोटोशूट करण्यास, एखाद्या चित्रपटातील रोमांटिक गाण्यावर व्हिडीओ तयार करण्यास जोडप्यांकडून प्राधान्य देऊ लागले आहे.
अर्थात लग्नात सुरु असलेले धार्मिक विधी, पाहुणे मंडळींची लगबग, अशा कारणांमुळे जोडप्यांना ‘प्री वेडिंगमध्ये काढता येतात. त्याप्रकारचे फोटो काढणे शक्यच नसते. त्यामुळे लग्न जमल्यानंतर बहुतांश जोडपी शुभमंगल सावधान होण्यास काही दिवसांचा अवधी असतानाच एखाद्या पर्यटनस्थळी जाऊन असे ‘प्री वेडिंग’ फोटोशूट करण्यास प्राधान्य देत आहेत. अनेक जोडपे तरी अशा प्री -वेडिंग फोटोशूटसाठी सुट्टीचे प्लॅनसुद्धा आखत आहेत.
साधारणपणे प्री-वेडिंग फोटोशूटसाठी एक ते दोन दिवसांचा अवधी लागत असला तरी पुढे आयुष्यभरासाठी सोबत घालवलेला दोन दिवसांचा वेळ, त्यामधील वेगवेगळे क्षण हे फोटोच्या रूपाने सोबत राहणार असल्यामुळे अशा शूटला तरुणाईची पसंती मिळू लागली आहे.
* चित्रपटामध्ये नायक -नायिकांना पाहिल्यानंतर आपल्याला देखील कधीतरी असे क्षण अनुभवता यावे, असे स्वप्न होते. त्यातच माझे लग्न जमल्यानंतर प्री वेडिंग करण्याचे आम्ही दोघांनी ठरविले. त्यानुसार पर्यटनस्थळी जाऊन आम्ही प्री वेडिंग फोटोशूट केले. यानिमित्ताने आमचे स्वप्न तर पूर्ण झालेच शिवाय एक कायमस्वरूपी आठवणीचा संग्रह झाला.
- नवविवाहित वधू-वर
* प्री वेडिंग ही संकल्पना काही वर्षापूर्वी आपल्याकडे नव्हती. या संकल्पनेचे चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याकडे अनुकरण झाले, असे म्हणावे लागेल. लग्नसोहळ्यामध्ये वर वधू आकर्षणाचे केंद्रबिंदू असतात. त्यामुळे आता प्रत्येक जोडप्याला वाटू लागले आहे की, आपण प्री वेडिंग फोटोशूट केले पाहिजे. यापूर्वी चित्रपटासारखे फोटोशूट करणे महाग होते. मात्र डिजिटल कॅमेरामुळे ते सहज शक्य होऊ लागले आहे. प्री वेडिंग फोटोशूट करताना वेगवेगळी क्रिएटिव्हीटी छायाचित्रकार वापरताना दिसत आहेत.
- वैभव जंगम, बुध.
* बजेटप्रमाणे लोकेशनची निवड
प्री वेडिंग फोटोशूटसाठी जोडप्यांच्या बजेटप्रमाणे त्यांना लोकेशनची निवड करून दिली जाते. जोडप्यांना नेमके कोणत्या गाण्यांवर चित्रीकरण करायचे आहे. त्यासाठी आवश्यक लोकेशन कोणते आहे? कपडे कशा पध्दतीची लागतील याबद्दलच्या कल्पना देखील जोडप्यांना दिल्या जातात. सर्वजण आपआपल्या आजूबाजूला असणार्या डोंगराचा परिसर, धरणाचा परिसर अशा वेगवेगळ्या ठिकाणी ही प्री वेडिंगचे फोटोशूट करण्यात येत असल्याचे छायाचित्रकार सांगतात. याशिवाय तू एखाद्या जोडप्याचे फोटोशूट करण्याचे बजेट हे जास्त असेल तर लोणावला, गोवा असे पर्यायही दिले जात आहेत.
* लग्न जमल्यानंतर प्री वेडिंग फोटोशूट करण्याची जोडप्यांमध्ये क्रेझ वाढताना दिसतेय. बर्याचवेळा एखाद्या चित्रपटातील रोमांटिक गाण्याप्रमाणे चित्रीकरण करण्याची जोडप्याची इच्छा असते. त्यानुसार आम्ही स्क्रिप्ट तयार करून त्याप्रमाणे जोडप्याचे चित्रीकरण करतो. ज्यांचे बजेट कमी आहे ते फक्त प्री वेडिंग फोटो काढण्यास प्राधान्य देतात. ज्यांचे बजेट जास्त आहे त्यांच्याकडून फोटो सोबतच वेगवेगळ्या गाण्यांवर व्हिडिओ सुध्दा तयार केले जातात.
-साईश कुंभार, सातारा.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |