10:59pm | May 14, 2020 |
सातारा : कोरोनाविरूध्दच्या युध्दात सातारा जिल्ह्यासाठी आजचा दिवसही गुड न्यूज घेऊन आला. कराडच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले ६ कोरोनाबाधित रुग्ण आज पूर्णपणे बरे झाले. विशेष आनंददायी बाब म्हणजे कोरोनायुध्दातील ‘फायटर्स’ असलेल्या ५ परिचारिकांचा व १० वर्षाच्या एका मुलाचा कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये समावेश आहे. दरम्यान, कालप्रमाणे आजही जिल्ह्यात कोरोनाची पाटी कोरी राहिली आहे. त्यामुळे इनकमिंग शून्य आणि आऊटगोईंग ६ अशी आजची कामगिरी झाली आहे.
या आठवड्यात जिल्ह्यात एका बाजुला कोरोनाचे रूग्ण वाढत असले तरी कोरोनामुक्त होण्यातही जिल्ह्याला मोठे यश आले आहे. परवा १५, काल ४ रूग्ण कोरोनामुक्त होऊन सुखरूप घरी परतले असून या यशाची पुनरावृत्ती आजही पहायला मिळाली. त्यामुळे जिल्हावासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या या पाच परिचारिका व १० वर्षाच्या मुलाच्या घशातील स्त्रावाची १४ व १५ दिवसानंतर पुन्हा चाचणी करण्यात आली. त्यामध्ये हे ६ कारोनाबाधित रुग्ण निगेटिव्ह आले आहेत. त्यानंतर त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदिप वाकडे, तालुका वैद्यकीय अधिकारी संगिता देशमुख, हॉस्पिटलचे संचालक अमित चव्हाण, वैद्यकीय प्रमुख व्यंकटेश मुळे यांनी पुष्पगुच्छ देवून या रुग्णांना भावपूर्ण निरोप दिला. यावेळी परिचारिका व कर्मचारी उपस्थित होते.
आजच्या सहा कोरोनामुक्तांसह जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांची संख्या ४५ वर पोहोचली आहे. त्यामध्ये सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथून ८, कराड येथील कृष्णा मेडिकल कॉलेज येथून २७, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय येथील ४ व सह्याद्री हॉस्पिटल येथील ६ रूग्णांचा समावेश आहे. दरम्यान, कालप्रमाणे आजही जिल्ह्यात कोरोना रूग्णांची नोंद झाली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा स्थिर आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |