10:48am | Jan 11, 2022 |
कराड : प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील दिव्यांगांच्या अनेक प्रश्नासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. मात्र, त्यांच्याकडुन दिव्यांगांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाले आहे, असा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रवक्ते शंभूराज उर्फ आझादसिंह खलाटे यांनी केला आहे. दरम्यान, संघटनेच्या माध्यमातुन जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडलेल्या प्रश्नावर निर्णय न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येत्या सोमवारी (दि.१७ रोजी) पक्ष व संघटनेकडून जिल्हा प्रशासनास 'गाढव भेट' देण्याचे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही खलाटे यांनी दिला.
येथील शासकीय विश्रामगृहात सोमवार दि. 10 रोजी आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल कारंडे, महिला जिल्हाध्यक्षा सुरेखा सुर्यवंशी, प्रहार पक्षाचे शिवाजी चव्हाण, विक्रम पाटील, महेश शिंदे, पाटण अध्यक्षा विद्या कारंडे, खटाव-माण विधानसभा अध्यक्ष अरविंद पिसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
खलाटे म्हणाले, जिल्हा प्रशासनाकडून दिव्यांगांना दिली जाणारी प्रमाणपत्रे व्यवस्थित दिली जात नसून त्यामध्ये अनेक त्रुटी राहत आहेत. तसेच राज्यमंत्री ना. बच्चू कडू यांचे आदेश असतानाही दिव्यांगांच्या विविध प्रश्नांसाठी अद्याप बैठक घेतली गेली नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
ते पुढे म्हणाले, साखरवाडी येथील महिलेस भूल न देताच झालेल्या शस्त्रक्रियेची चौकशी करून त्यातील दोषींवर कारवाई करावी. तसेच न्यू फलटण शुगर वर्क्स कारखान्याकडून शेतकऱ्यांना येणे असलेल्या रक्कमेची तातडीने वसूली करण्यासाठी संबंधितांना आदेश द्यावेत, या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. परंतु, त्यांच्याकडून या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याने येत्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 'गाढव भेट' देण्याचे आंदोलन करणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |

राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |