11:31am | Oct 07, 2021 |
लखनऊ : उत्तरप्रदेशच्या बाराबंकी जिल्ह्यात गुरुवारी पहाटे झालेल्या एक भीषण रस्ते अपघात घडला. डबलडेकर व्होल्वो बस आणि ट्रकमध्ये जोरदार धडक झाल्याने हा अपघात घडलाय. या भयंकर अपघातात 14 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती हाती येत आहे, तर जवळपास 30 जण गंभीर जखमी झालेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
बस आणि ट्रकमध्ये धडक झाल्यानंतर अवाढव्य ट्रकचाही चक्काचूर झाला आहे. अपघातग्रस्त गाड्यांची अवस्था पाहिल्यानंतर हा अपघात किती भयंकर होता याची कल्पना येऊ शकेल.
गुरुवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडल्याचे समजत आहे. लखनऊपासून जवळपास 20 किलोमीटर अंतरावर देवा स्टेशन परीसरात माती रोडवर हा अपघात घडला आहे. वाळूने भरलेल्या आणि चुकीच्या बाजुने भरधाव वेगाने येणार्या ट्रकने समोरून येणार्या व्होल्वो बसला जोरदार धडक दिली. डबलडेकर बसमधून प्रवास करणार्या या प्रवाशांना या अपघातामुळे जोरदार झटका बसला. या अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढल्याची माहिती हाती येत आहे.
जखमींना बाराबंकीच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. यातील काही जखमी प्रवाशांची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. त्यांना अधिक उपचारासाठी लखनऊला धाडण्यात येण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाळूनं भरलेला ट्रक दिल्लीहून बहराइचला जात होता. अपघाताची माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. जेसीबी मशीनच्या सहाय्याने बस आणि ट्रकचा सांगाडा हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |
अजित वाकनीस यांचे निधन |