02:19pm | Mar 07, 2022 |
लग जा गले…
लग जा गले की…..
फिर वो हसी रात हो ना हो
शायद इस जनम मे
मुलाकात हो ना हो
लतादीदींनी गायलेलं एक अजरामर असं गीत. आज आहे तो क्षण जगून घेऊ या काय माहीत पुढचा क्षण आपला असेल-नसेल, परत भेट होईल न होईल असा काहीसा भावार्थ असणार हे गाणं मनात खोलवर विचार करायला लावत. २१ व्या शतकाची चाके जितक्या वेगाने धावतायात त्याच्या दुप्पट वेगानं आपलं आयुष्य धावतंय. जगाच्या बाजारात आपलं नाण चाललं पाहिजे म्हणून, इथे प्रत्येक जण जिवाचा आटापिटा करतो. वाऱ्याच्या वेगाने धावतो.
आम्ही बायका तर जन्मल्यापासून ते मरेपर्यंत स्वतः भोवती एक कुंपण घालून घेतो. घरदार, मूलबाळ, नातेवाईक, कुटुंब यापलीकडे आमचं जग नसतच मुळी सहनशीलता आणि समर्पण याचा जणू आम्ही ठेकाच घेतलेला असतो. लहानपणापासून भातुकलीच्या खेळात रमणार आम्हां बायकांचं मन मोठेपणीही संसाराच्या, कुटुंबाच्या भोवतीच फिरत राहतं. घरादाराने केलेला पसारा मलाच आवरायचा आहे. तुटलेलं सगळं मलाच तर सांधायचं आहे. या भावनेतून आयुष्यभर आवरण्याचं, सावरण्याचं, बांधण्याचं, आणि जोडण्याचं काम आम्ही बायका करत असतो.
मुलगी म्हणून, बहीण म्हणून, बायको म्हणून जगतो. आईचं आईपण निभावतो, प्रेयसी बनुन प्रियकर कसाही असला तरी साथ देण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक आघाड्यांवर सक्षम पणे लढत असतो. सावित्रीबाईंनी प्रत्येक संकटाचा निर्भयपणे सामना केला. कारण, त्यांच्यासोबत जोतिबा होते. पण आताच्या आधुनिक सावित्रीला तिच्या जोतिबाची साथ प्रत्येक वेळी मिळतेच असे नाही. अन्यायाविरुद्ध लढताना कधीतरी ती एकटी पडते. चूल आणि मूल असं मर्यादित कार्यक्षेत्र न ठेवता चार भिंतीच्या बाहेर पडून ती आज तिचं अस्तित्व सिद्ध करू पाहतेय.
त्यामुळे प्रत्येक वेळी तिला संरक्षण कवच मिळतचं अस नाही. तिला मागं खेचण्यासाठी डावपेच होतात. कितीही सक्षम असली तरी मानसिक दृष्ट्या अपंग बनवण्यासाठी तर तिच्या भावनिक स्वभावावर घाला घातला जातो. कधी नवरा म्हणून अधिकार गाजवला जातो तर कधी मुलांची ढाल करून तिला मानसिक दृष्ट्या कमकुवत बनवलं जातं तर कधी प्रियकर बनवून भावनांशी खेळ करून तिचं अक्षरशः खेळणं करून टाकलं जातं.
अशा वेळी कितीही खंबीर स्त्री असली तरी कुठं ना कुठं आतून कोलमडून जाते. कधी कधी मग मृत्यूला जवळचा मित्र मानून त्याच्या गळ्यात माळ घातली जाते. कधी कधी न बरं होणार डिप्रेशन, मानसिक संतुलन बिघडणं आणि यापेक्षा भयानक प्रकार घडतात. कुटुंबाची वाताहत होते, ती वेगळीच आणि इतकं सगळं होऊनही ज्याच्यामुळे ही परिस्थिती उद्भवते ती माणसे मात्र "जीवाशी खेळणे हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे "या थाटात ऐष आरामात जगतात.
आपण बायका नात्यांच्या सगळ्या रंगात रंगतो पण ते प्रत्येक नातं आपल्या रंगात रंगले हे आपण बघतच नाही. जेव्हा रंगाचा बेरंग होतो तेव्हा आम्ही स्वतःलाच भरडून घेतो. विकृतीने ग्रासलेले ते चेहरे पुन्हा उजळ माथ्याने नव्या रंगात रंगायला मोकळे होतात. म्हणूनच थांबूया आता हे भरडणं. इथं कुणीच कुणाचं नसतं. तुला समजून घेणारं, जर कोणी असेल तर तुच आहेस. तुला प्रेरणा देणारे कोणी नसेल तर नसू दे आता तुला तुझी प्रेरणा व्हायचं आहे. तुझी साथ अर्ध्यावरच कोणी सोडून गेले असेल तर खुशाल जाऊ दे. आता तुलाच तुझा सहचर बनायचं आहे. तुझं कौतुक कुणीही नाही करू दे आता तुझं तुलाच सांगायचे आहे I AM THE BEST.
तुझा स्वाभिमान जितक्या वेळा चिरडला जाईल, इतक्या वेळा तितक्याच ताकदीने तुला पुन्हा निर्धाराने उभं राहायचं आहे. नवऱ्याने दुसरे लग्न केले, प्रियकराने फसवले, सासरच्यांनी छळले, ऑफिसमध्ये टॉर्चर करणे या सगळ्यांवर आपलं आयुष्य संपवणं हा उपाय होऊ शकत नाही. मृत्यूला कवटाळून प्रश्न कधीच सुटत नसतात. You Have to Face. तुला सज्ज व्हायचयं प्रत्येक प्रसंगाला तोंड द्यायला.
तुला मानसिकदृष्ट्या अपंग बनवणारी सगळी भावनिकता तुला जाळून टाकायची आहे. तुला खाली खेचू पाहणाऱ्या, त्रास देणाऱ्या त्या व्यक्ती भलेही तुझ्या जवळच्या असतील. त्यांच्या त्रासाचा उपयोग सकारात्मकता वाढवण्यासाठी कर. तुझ्या अंगी त्या नकारात्मक गोष्टीतून इतकी प्रेरणा निर्माण कर की, त्या त्रास देणाऱ्या हातांनाच प्रणाम करून तू सांगु शकशील की, आज मी जी कुणी आहे ते तुमच्या त्रासामुळे मिळालेल्या प्रेरणेतून.
इतकी ऊर्जा तुझ्यात साठव की, कितीही मोठे आघात हसत हसत सहन करशील. मनात नेहमी एक विचार ठेव हातात जेव्हा काहीच नसतं, ओंजळ रिकामी असते तेव्हाच ती भरण्यासाठी प्रयत्न करायला मजा असते. एखाद्याने त्याची भरलेली ओंजळ दुसऱ्याच्या हातात रिकामी केली तरी स्वाभिमानाने स्वतःच्या कष्टाने ओंजळ भरल्याची जाणीव भावना तो देऊ शकत नाही. तुझा स्वाभिमान तुला जपायचा आहे आणि त्यासाठी तुला खंबीर व्हायचं आहे.
तू कोण आहेस, हे दुसऱ्यांनी सांगण्यापेक्षा तू कोण आहेस, हे तुलाच आधी ओळखायचं आहे. त्यासाठी येणाऱ्या प्रत्येक संकटाला “लग जा गले” असे हसत हसत म्हणायला शिक. आहे हा क्षण माझा आहे, तो मला माझ्यासाठी जगायचा आहे. येणारा प्रत्येक क्षण मला काहीतरी छान शिकवण्यासाठी येणार आहे, असा विचार करायला शिक. आहे हा क्षण मला छान आनंदात घालवायचा आहे. पुढचा क्षण कसा असेल माहीत नाही. तो क्षण माझ्या नावावर लिहिला असेल की, नाही ते ही माहित नाही. म्हणून येणारा क्षण कसा असेल या विचारात आत्ताचा क्षण सोडू नकोस. प्रत्येक क्षणाच्या स्वागताला हास्याची माळ घेऊन तयार रहा. त्या क्षणांना तुझ्या मिठीत येऊन शांत होऊ दे.
तुझ्या मनातलं तुझ्या बद्दलच प्रेम इतकं वाढव की, त्या प्रेमाने ते वेदनांचे क्षणही चिंब न्हाऊन निघतील आणि आनंदानं नाचायला लागतील आणि आपोआपच तुझ्या आयुष्यात आनंदाला उधाण येईल. आनंदाचे क्षणच तुला मग सतत “लग जा गले” असं म्हणून आनंदाने मिठी मारतील. म्हणून सज्ज हो वेदनांना आनंदाने मिठी मारून आपलंसं करायला आणि आनंदाच्या प्रत्येक क्षणाचं बीज वेदनेतून निर्माण करायला. तुझा तुझ्याशीच अनोखं प्रेमाचं नातं तयार कर. स्वतःवर भरभरून प्रेम करायला शिक. मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार या तत्वानुसार दुसऱ्याने आखलेल्या मार्गावरून डोळे झाकून चालण्यापेक्षा तुझा नवीन मार्ग तू शोध. तुझ्या सारख्या कितीतरी जणी अशा मानसिक कुचंबणेत अडकल्या असतील त्यांचा शोध घे. त्यांच्यासाठी आधार हो, प्रेरणा हो, ऊर्जेचा स्रोत बन.
नवा उजेड देणारा नवा सूर्य बनायचंय तुला म्हणूनच मावळतीकडे पुन्हा पुन्हा लक्ष देऊ नकोस. वाट उजळायचीच ना तर पुढे चल. निर्धाराने तुझ्यासारख्या प्रत्येकाला सोबत घेऊन चालत राहा. अखंड चालत राहा. तुझ्यासाठी आणि तुझ्यातल्या स्वाभिमानासाठी चालत राहा. तुझ्या अशा लढाऊ चालण्याने अन् स्वाभिमानी वागण्याने एक दिवस सगळं जग तुझ्या प्रेमात पडेल आणि नक्कीच म्हणेल “लग जा गले”...
सौ. आराधना गुरव
शबदांकन : प्रकाश राजेघाटगे
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर |
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर |
प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीसाठी रमेश उबाळे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण |
केंद्रीय गृहमंत्री अजयकुमार मिश्रा उद्या सातारा जिल्हा दौऱ्यावर |
साताऱ्यात ८ रोजी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचा मेळावा |
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी |
माहिती अधिकार दिन 27 सप्टेंबर रोजी होणार साजरा |
शेडनेट, हरितगृहासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत |
चार मतदान केंद्र पुनर्गठित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर |
व्हेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणी |
खेकड्यांच्या स्थलांतरावर होणार संशोधन! |
अँटीकरप्शनच्या उज्वल वैद्य यांची मुंबईला बदली |
एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा |
जबरी चोरीसह खंडणी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघातासह गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा |
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी |
माहिती अधिकार दिन 27 सप्टेंबर रोजी होणार साजरा |
शेडनेट, हरितगृहासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत |
चार मतदान केंद्र पुनर्गठित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर |
व्हेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणी |
खेकड्यांच्या स्थलांतरावर होणार संशोधन! |
अँटीकरप्शनच्या उज्वल वैद्य यांची मुंबईला बदली |
एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा |
जबरी चोरीसह खंडणी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघातासह गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा |
अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या |
मोटर सायकल वरून पडून एकाचा मृत्यू |
सातारा शहरातील 61 जणांवर तडीपारीची कारवाई |
इलेक्ट्रिक मोटार चोरणारी टोळी सातारा जिल्ह्यातून तडीपार |
नमस्कार सातारकर, हे आहे हिंदवी 89.6... |