04:14pm | Jul 01, 2022 |
सातारा : कोरेगाव शहरातील एका प्रसिध्द सोन्या चांदीच्या व्यापाऱ्यास त्याच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देत 20 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपीस कोरेगाव पोलिसांनी केवळ 48 तासांच्या आत जेरबंद करत अभिनंदनीय कामगिरी बजावली आहे. राजेंद्र भगवान मोहिते (रा.लक्ष्मीनगर, कोरेगाव) असे खंडणी प्रकरणी अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. कोरेगाव पोलिसांच्या या कामगिरीचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह जनतेमधून अभिनंदन होत आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, कोरेगाव शहरातील प्रसिध्द सोनारास त्याच्या चांगुलपणाचा फायदा घेवुन त्याच्या मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी देवून चोरीच्या वेगवेगळ्या मोबाईलवरुन फोन करुन अज्ञात व्यक्ती एका गुंडाचे नाव घेवून वीस लाखाची खंडणी मागत होता. या प्रकारामुळे संबंधित व्यापारी व त्याचे कुटुंबीय, मित्रपरिवार भयभीत झालेले होते. त्यांनी याबाबत कोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक अजय बन्सल, अतिरिक्त पोलीस अधिक्षक अजित बोऱ्हाडे, कोरेगावचे पोलीस उप अधीक्षक गणेश किंद्रे यांनी गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना कोरेगाव पोलिसांना दिल्या.
सिमकार्ड कोल्हापुरातील इसमाचे व त्याचा वापर सातारा जिल्ह्यात
कोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक नितीन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार सहाय्यक पोलीस निरिक्षक अर्चना शिंदे व उपनिरिक्षक विशाल कदम-पाटील व पोलीस अंमलदार यांनी गोपनियता राखत तपासाला आरंभ केला. यामध्ये कोरेगाव पोलिसांनी बुध्दी कौशल्याने मोबाईल संबंधी तांत्रिक माहितीचे विश्लेषण करुन संशयीत मोबाईल क्रमांक हस्तगत केले. सुरुवातीस खंडणीखोराच्या मोबाईल हँण्डसेट व सिमकार्ड खरेदीबाबत कोरेगाव शहरातील मोबाईल शॉपी मालकांकडे चौकशी केली असता कोल्हापुर जिल्ह्यात धागेधोरे असलेचे समजुन आले. मात्र, त्याबाबत अधिक चौकशी केली असता सिमकार्ड कोल्हापुरातील इसमाचे व त्याचा वापर सातारा जिल्ह्यात होत असल्याचे समोर आले.
खंडणीची रक्कम घेवून त्रिपुटी खिंडीत बोलावले
त्यादरम्यान संबंधीत व्यापाऱ्यास खंडणीखोराने खंडणीची रक्कम घेवून त्रिपुटी खिंड परिसरात बोलावले होते. त्यावेळी त्याठिकाणी कोरेगाव पेलीस स्टेशनकडील अधिकारी व पोलीस अंमलदार असे 15 ते 20 जणांनी पोलीस उप अधीक्षक गणेश किंद्रे व पोलीस निरिक्षक नितीन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीखोरास पकडण्यासाठी कोणी शेतकन्याचे, कोणी वारकऱ्यांचे वेष धारण केले. वेषांतर केलेले पोलीस पथक कोरेगाव ते खावली पर्यंतच्या परिसरात सापळा रचून थांबले होते. मात्र, खंडणीखोरास त्याची शंका आल्याने तो त्याठिकाणाहुन पळुन गेलेला होता.
आरोपीने मोबाईल बंद ठेवला तरी तपासात यश
त्यानंतर त्याने संबंधीत व्यापाऱ्यास “तु माझी शाळा करतो काय, तुला बघुन घेतो!“ असे धमकावून खंडणीखोराने त्याचा मोबाईल क्रमांक बंद ठेवला. त्यानंतर सदरचा गुन्हा उघडकीस आणणे मुश्किल झाले होते. मात्र पोलिसांनी कोरेगाव परिसर तसेच भुर्इंज, पुसेगाव परिसरातील असंख्य मोबाईलची माहिती मिळवून त्याचे विश्लेषण केले. खास बातमीदार नेमून नव्या दमाने तपास सुरु केला. त्यावेळी खंडणीखोर संशयित कोरेगाव शहरातील लक्ष्मीनगर येथील जुन्या रेल्वे लाईन परिसरात लपून बसला असल्याची खबर लागली. त्याठिकाणी तपासी अंमलदार सहाय्यक पलीस निरिक्षक अर्चना शिंदे व सहकारी पोलिसांनी सापळा रचला. संशयित तिथे आढळूनही आला मात्र पोलिसांना पाहताच तो पळून जावू लागला. मग पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन पकडले.
खंडणी मागितल्याची दिली कबुली
खंडणीखोर राजेंद्र मोहिते हा होता. त्याच्या ताब्यातील घातक हत्यारासह, गुन्ह्मात वापरलेल्या मोबाईलसह त्याला ताब्यात घेवून त्याच्याकडे सुरुवातीस विचारपुस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्यास मोबाईल संबंधी तांत्रिक माहितीबाबत सांगून विश्वासात घेतले असता. मग याने त्याच्या साथीदारासह संबंधीत व्यापाऱ्यास आर्थिक अडचण असल्याने खंडणी मागितल्याची कबुली दिली. आरोपी राजेंद्र भगवान मोहिते रा.लक्ष्मीनगर, कोरेगाव हा असून त्याला लगेच अटक करुन कोरेगाव न्यायालयासमोर उभे केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच्या साथीदाराचा शोध सुरु आहे. गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक अर्चना शिंदे करत असून कोरेगाव शहरातील मोबाईल शॉपी चालक व मालकांना ग्राहकाची कागदपत्रांची खातरजमा केलेशिवाय सिमकार्ड व मोबाईल विक्री करु नये, असे आवाहन कोरेगाव पोलिसांनी केले आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |