नवी दिल्ली : कोरोनामुळे देशातील आरोग्य यंत्रणेचे तीनतेरा वाजल्याचं चित्र आहे. रोजच कोरोना रुग्णांची नकोशी विक्रमी नोंद होत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची साखळी तोडण्याचं मोठं आवाहन प्रशासनासमोर आहे. कोरोना लसीकरणाचा वेग वाढवणं देखील महत्त्वाचं आहे. मात्र गेल्या काही दिवसात लसींचा पुरवठा कमी होत असल्याने काही ठिकाणी लसीकरण केंद्र बंद आहेत. त्यामुळे विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी तर रोजच सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारवर टीका करत आहेत. केंद्र सरकार सर्वच पातळींवर अपयशी ठरल्याचा त्यांनी आरोप केला आहे.
त्यात कोरोना व्हॅक्सिनच्या किंमतीनंतर आता त्यावर वसूल करण्यात येण्याऱ्या कराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. शुक्रवारी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना पत्र लिहून व्हॅक्सिन खरेदीवरील जीएसटी टॅक्स माफ करण्याची विनंती केली होती. त्या मागणीवरून आता राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.
नागरिकांचा जीव जात असताना पंतप्रधान कर वसूल करण्यात मग्न असल्याची बोचरी टीका त्यांनी ट्वीटमधून केली आहे. ‘जनता के प्राण जाए पर PM की टॅक्स वसूली ना जाए’, असं ट्वीट त्यांनी केलं आहे. त्याचबरोबर हॅशटॅग जीएसटीचाही वापर केला आहे.
सरकारने परदेशातून येणाऱ्या करोना व्हॅक्सिनवरील जीएसटी माफ केला आहे. मात्र देशात तयार होणाऱ्या व्हॅक्सिनवर जीएसटी आकारला जात आहे. केंद्र सरकारकडून कोरोना व्हॅक्सिनवर ५ टक्के जीएसटी आकारला जात आहे.
कोविशिल्डच्या एका डोससाठी राज्यांना ३०० आणि कोव्हॅक्सिनच्या एका डोससाठी ४०० रुपये राज्यांना मोजावे लागत आहेत. त्यावर ५ टक्के जीएसटीही आकारला जात आहे. त्यामुळे कोविशिल्ड ३१५ तर कोव्हॅक्सिन ४२० रुपयांना पडत आहे. त्यामुळे राज्यांवर जीएसटीचा अतिरिक्त भार पडत आहे. यासाठी राज्यांकडून आता जीएसटी माफ करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |