10:13pm | May 20, 2022 |
सातारा : शहरातील प्रसिद्ध असणाऱ्या डी. जी. महाविद्यालयाच्या प्रागंणात युवकांच्या दोन गटात शुक्रवारी तुंबळ हाणामारी झाली. याच महाविद्यालयातील दोन तरुणांचा धक्का लागल्याने ही भांडणे सुरु झाली. धक्का लागल्याचा राग मनात धरुन शिवीगाळ करत याच महाविद्यालयातील युवकांच्या एका गटाने दोघांच्या डोक्यात मारुन त्यांना जखमी केले आहे. मारहाण करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध उशीरा पर्यत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
डी. जी. काँलेजच्या प्रागंणात शुक्रवारी याच महाविद्यालयात शिकणा-या दोन विद्यार्थ्यांचा धक्का एका विद्यार्थ्यांला लागला. यामुळे धक्का लागलेल्या युवकांने शिवीगाळ केली. यांचा राग मनात धरुन ही भांडणे सुरु झाली. एकमेकांना हाताने मारहाण करण्यात आली. नंतर शिवथर येथील मुलांनी धारदार हत्यारे नाचवत काँलेजच्या प्रागंणात घुसून या विद्यार्थ्यांना मारहाण करु लागले. या मारहाणीत दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.
महाविद्यालयाच्या गेट बाहेर होणारी भांडणे आता प्रागंणात होत आहेत. शुक्रवारी झालेली भांडणे यांचे प्रत्यक्ष उदाहरण आहे. या भांडणामुळे संपूर्ण वातावरण तणावपूर्ण झाले. धारदार शस्त्र पाहून विद्यार्थी प्रगंणात पळत होते. महाविद्यालयाच्या गेटवर शिपाई असताना ही बाहेरील मुलांनी आत प्रवेश कसा केला याबाबत शंका व्यक्त होत आहे.
निर्भया पथक गेले कुठे ?
महाविद्यालय परिसरात होणारी भांडणे, छेडछाड अशा घटनांना आळा बसावा म्हणून स्थापन करण्यात आलेले निर्भया पथक गेले कुठे ? हे शोधण्याची वेळ आली आहे, निर्भया पथक सक्रिय नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये निर्भयाचे कोणतेही भय उरलेले दिसत नाही.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |