09:10pm | Jan 11, 2022 |
कराड : कराड पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्यात ग्रामपंचायतींच्या करवसुलीसाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. त्यामध्ये तालुक्यातील दोनशे ग्रामपंचायतींची करवसुली करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने पंचायत समितीच्या पुढाकारातून तालुक्यातील सर्व गावांमध्ये मोहीम स्वरूपात 13 व 14 जानेवारी 2022 रोजी महाकरवसुली अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी डॉ. शशिकांत शिंदे यांनी दिली.
तालुक्यात चालू आर्थिक वर्षामध्ये आत्तापर्यंत 50 टक्के कर आकारणी झाली असून अद्यापही 13 कोटी 89 लाख 83 हजार इतकी रक्कम येणे बाकी आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यातील गावांमध्ये मोहीम स्वरूपात 13 व 14 जानेवारी 2022 रोजी महाकरवसुली अभियान राबवण्यात येणार आहे.
सद्यस्थितीत करवसुली कमी असल्यामुळे तालुक्यातील विविध विकासकामांना खीळ बसली आहे. तसेच येऊ घातलेल्या कोरोनाच्या संकटामध्येही ग्रामपंचायतीकडे खर्चासाठी निधी असणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने ग्राम निधीतून होणाऱ्या 5 टक्के, 10 टक्के आणि 15 टक्के निधी विकासकामावर परिणाम झाला आहे. ग्रामपंचायत अनुषंगिक खर्च प्रलंबित थकबाकीमुळे करणे अवघड झाले आहे. यावर उपाय म्हणून कराड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी शशिकांत शिंदे यांच्या पुढाकारातून व सभापती, उपसभापती यांच्या नेतृत्वाखाली, तसेच सर्व सरपंच, पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य यांच्या सहभागातून अधीनस्थ विविध विभागाशी समन्वय साधत महाकरवसुली अभियानाची परिणामकारक अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
या महाकरवसुली मोहिमेसाठी विस्तार अधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत कार्यकारणी, ग्राम विकास अधिकारी, ग्रामसेवक यांनी कंबर कसली आहे. तसेच महाकरवसुली मोहिमेदरम्यान तालुक्यातील २०० ग्रामपंचायतींमध्ये थकीत करवसुली बरोबरच प्रलंबित करबाकी, वादग्रस्त प्रकरणे यांचाही निपटारा करण्यात येणार आहे. शिवाय, थकित प्रत्येक खातेदाराच्या घरापर्यंत ग्रामपंचायत वसुलीची धडक मोहीमही राबवण्यात येणार आहे.
त्यामुळे या महाकरवसुली अभियानाची ग्रामपंचायत स्तरावरून प्रचार व प्रसिद्धी करण्यात येत असून जप्ती व नळ कनेक्शन तोडण्याबाबतही संबंधितांना नोटीसा देण्यात येणार आहेत. तरी तालुक्यातील सर्व थकीत खातेदारांनी महाकरवसुली मोहिमेदरम्यान थकीत कराची रक्कम भरावी. तसेच गावस्तरावर ग्रामपंचायतींनी महाकरवसुली मोहीम प्रभावीपणे राबवून ही मोहीम यशस्वी करण्याचे आवाहनही सभापती प्रणव ताटे, उपसभापती रमेश देशमुख, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे यांनी केले आहे.
दरम्यान, आज मंगळवारी ११ रोजी दुपारी ४ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांशी संवाद साधून महाकरवसुली मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन व मार्गदर्शन करण्यात आले आहे.
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |