12:08am | Jul 05, 2020 |
सातारा : १ कोटी ६८ लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाल्याचे खोटे पत्र देऊन कर्जासाठी विविध शुल्कासाठी २ लाख २९ हजार २७९ रुपये घेऊन बारामती येथील एक्सिटो सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे मालक अमित परदेशी यांच्यासह पाच जणांनी माझी फसवणूक केली असल्याची तक्रार गोरखपूर, (पिरवाडी) सातारा येथील महिला उद्योजक सौ. प्रतिभा चंद्रकांत पवार यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केली. संबंधित तक्रारीची शहानिशा करून पोलिसांनी अमित अमरसिंग परदेशी आणि मनोहर औदुंबर भारती यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे सातारा जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
सौ. प्रतिभा चंद्रकांत पवार यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की मोरया पॅकेजिंग इंडस्ट्रीज नावाच्या कंपनीची मी मालकीन आहे. सचिन विजय काळभोर रा. मयुरेश अपार्टमेंट, सुर्यनगर, बारामती यांची बारामती येथे शंभूराज इंटरप्राईजेस नावाची कंपनी होती. दि.१ डिसेंबर २०१८ रोजी सचिन काळभोर यांनी माझे पती चंद्रकांत पवार यांची ओळख अमित अमरसिंग परदेशी या व्यक्तीशी करून दिली. सचिन काळभोर आणि अमित परदेशी हे दोघे एकत्र कर्ज प्रकरणाची कामे करतात. दरम्यान अमित परदेशी यांनी आम्हाला सांगितले की, बारामती येथील एक्सिटो सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आमची असून ती सर्व प्रकारची वित्तपुरवठा करते. आम्ही या कंपनीबाबत खात्री करून घेतल्यानंतर त्यांच्याकडे माझ्या नावे असलेल्या मोरया पॅकेजिंग इंडस्ट्रीज या कंपनीची फाईल कर्ज प्रकरणासाठी दि.६ डिसेंबर २०१८ रोजी अमित परदेशी यांच्याकडे दिली.
कर्ज प्रकरण मंजूर करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे शुल्क म्हणून वेळोवेळी बारामती येथील एक्सीटो बारामती एक्सिटो सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या खात्यावर २ लाख २९ हजार २७९ रुपये आम्ही पाठवले. तदनंतर अमित परदेशी यांनी मोरया पॅकेजिंग इंडस्ट्रीज या कंपनीला १ कोटी ६८ लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाल्याचे पत्र पाठवले. प्रत्यक्षात मात्र कर्ज वितरण करण्यास टाळाटाळ केली. तदनंतर अमित परदेशी यांनी तुमचे कर्ज प्रकरण डीबीएस बँक ऑफ इंडिया पुणे शाखा आणि एस. एम. जी. ग्रुप मुंबई येथून करून देतो असे सांगत बँकेचे फॉर्म भरून घेण्यास आमच्याकडून १२०० रुपये शुल्क घेतले. मात्र याही प्रकरणात आमची फसवणूक झाली. माझी फसवणूक झाल्याची बाब माझ्या लक्षात येताच अमित परदेशी यांना वकिलामार्फत नोटीस पाठवली असता ती नोटीस घेण्यास त्यांनी टाळाटाळ केली. त्यावरून मला समजले की, त्यांचा बारामतीतील पत्ता बदलला आहे. दरम्यान अजित परदेशी यांनी माझ्या पतीला विनंती करून तुम्ही कायदेशीर कारवाई करू नका. मी तुम्हाला ५ सप्टेंबर २०१९ रोजीच्या आधी तुम्हाला कर्जाची पूर्ण रक्कम देतो असे सांगितले. मात्र कर्जाची रक्कम मला मिळाली नाही. अमित परदेशी यांनी रोज काहीतरी नवीन कारणे सांगून टाळाटाळ करण्यास सुरुवात केली.
त्यानंतर आम्ही आमच्या वकील यांच्यामार्फत दि.२० नोव्हेंबर २०१९ रोजी अमित परदेशी, मनोहर औदुंबर भारती यांना आणखी एक नोटीस पाठवली. त्यांनी ती न घेता परत पाठवल्याने आम्हाला अशी खात्री पटली की, अमित परदेशी, मनोहर औदुंबर भारती या दोघांनी त्यांची कंपनी एक्सिटो सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड मार्फत माझी फसवणूक केली आहे. त्यामध्ये कंपनीचे अन्य संचालक समीर मोरे, रा. दौंड, प्रवीण शहाणे, संदीप कलानी या ५ जणांनी मला कर्ज वितरण न करता माझी फसवणूक केली असल्याने त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. सौ. प्रतिभा पवार यांनी अनेक पुरावे जोडले होते.
सातारा शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी प्राप्त झालेल्या तक्रारीची शहानिशा केली असता त्यामध्ये तथ्य आढळल्यामुळे अमित अमरसिंग परदेशी आणि मनोहर औदुंबर भारती या दोघांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |