02:39pm | Apr 12, 2021 |
- अजित जगताप
सातारा : छत्रपतींची राजधानी अशी ओळख असलेल्या सातारा जिल्ह्यात कर्तबगार अधिकारी होवून गेले आहेत. आजही त्यांचे नाव जनतेच्या हृदयात आहे. परंतू सध्या सातारा जिल्ह्यातील कोरोना संसर्ग रोखण्यात अपयश आले असून यापाठिमागे कारवाईशून्य कारभार असल्याचेच सिद्ध होत आहे. सातारकरांना गृहित धरल्यामुळे नियम पाळणार्या नागरिकांना कोरोनाची भीती आजही मानगुटीवर कायम आहे.
जिल्ह्यात अनेकदा नियमांची अंमलबजावणी न करता नियम तोडण्याचे प्रकार जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणेला पुराव्यासह सादर करण्यात आले होते. परंतू त्यावर कोणतीही कारवाई होवू शकलेली नाही. पहिल्या लॉकडाऊनमध्ये राज्याचे गृहराजमंत्री (ग्रामीण) तथा जिल्ह्याचे सुपूत्र शंभूराज देसाई हे आपल्या सातारा शहरातील बंगल्यासमोर सायंकाळी मैफिल जमवत होते. वडूज, ता. खटाव येथे शिक्षक पुरस्कार देण्यासाठी झालेल्या कार्यक्रमात ङ्गनो मास्क, नो एन्ट्रीफ असा फलक लावूनही जिल्हा परिषद अध्यक्ष ते खटावचे गटशिक्षण अधिकारी यांनी तोंडाला मास्क न लावता कार्यक्रमाला हजेरी लावली. शासकीय विश्रामगृहामध्ये तर अनेकदा नियम मोडले गेले. एवढेच काय तर शासकीय कार्यक्रमात भरगच्च गर्दी (त्यामध्ये प्रसारमाध्यमांचीही भर) हे उघड्या डोळ्यांनी प्रशासकीय अधिकारी, पोलीस यंत्रणा पाहत होती. अनेकांनी मास्क न लावता सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावली होती. याबाबत कारवाई झाली असती तर आजमितीस 73 हजार 194 बाधित निष्पन्न झालेच नसते. 1 हजार 971 जणांना आपल्या प्राणास मुकावे लागले नसते, हे आता उघड झाले आहे.
जन्म आणि मृत्यू यामध्ये एका श्वासाचे अंतर असते. मृत्यू कोणाच्याही हाती नाही, हे जरी खरे असले तरी संसर्गजन्य रोग काबूत आणण्यासाठी कायदेशीर आदेशाची कडक अंमलबजावणी होणे गरजेचे असते. आजही राजकीय नेत्याच्या अवतीभोवती कार्यकर्त्यांचा गराडा असतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे गेल्या काही दिवसांपासून कोरोनायोद्धा या पुरस्काराची संख्या कोरोनाबाधितांपेक्षा जास्त वाढली आहे. ज्यांनी प्रामाणिकपणे काम केले, त्यांना पुरस्कार मिळणे हा त्यांचा अधिकारच आहे. पण, एका गटा-तटाच्या किरकोळ कार्यकर्त्यालाही कोरोनायोद्धा पुरस्कार देवून आयोजकांनी या पुरस्काराची किंमत कमी करुन ठेवली आहे.
कोरोनाबाबत वस्तुनिष्ठ माहिती घेण्यासाठी केंद्रीय पथकाने पाहणी दौरा केला. त्यामध्ये देशाची आर्थिक राजधानी असलेला महाराष्ट्र, पीक उत्पादनाबाबत अग्रेसर असलेला पंजाब व गरीबीमुळे मागे राहिलेला छत्तीसगड या सर्वाधिक प्रभावी असलेल्या राज्यांचा दौरा या पथकाने केला. त्यावेळी दूध का दूध व पानी का पानी याची वस्तुनिष्ठ माहिती या पथकाच्या समोर आली आहे. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात कागदी घोडे नाचविणार्या प्रशासनाला खरा घोडा दाखविण्याची वेळ आली, त्यावेळी त्यांच्याकडे सत्य माहितीचा घोडा नसल्यामुळे त्यांना शिंगरु दाखविण्याची नामुष्की आली. केंद्रीय पथकाने सातारा जिल्ह्याची परिस्थिती हाताळण्यात प्रशासनाला अपयश आल्याचे मान्य केले. तसेच जिल्हा प्रशासनाने काही बाबी गांभीर्याने घेतल्या नाहीत, हे प्रकर्षाने जाणवले. एरव्ही निधी उपलब्ध झाला की, श्रेय लाटणारे नेते आपल्या प्रसिद्धीप्रमुखामार्फत पत्रकबाजी करुन मनोरंजन करतात. परंतू जिल्हा प्रशासनाच्या अपयशाचे खापर आता कोणावर फोडले जाईल? असा प्रश्न सातारकर जनतेला पडला आहे.
केंद्रीय पथकाने वस्तुनिष्ठ स्थिती दाखवून सुधारणा करण्याची संधी दिली आहे. ही संधी हुकली तर कोरोना संसर्ग रोखण्यात देवसुद्धा कमी पडेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, लॉकडाऊनला विरोध करणार्यांनी बाधितांची आकडेवारी कमी करण्यासाठी एखादी उपाययोजना राबवावी. जेणेकरुन कोरोना आटोक्यात येईल, अशी भावना व्यक्त केली जात आहे.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |