02:08pm | May 04, 2021 |
मुंबई: वाढत्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या आयपीएलवर स्थगितीचे सावट गडद होत चालले होतेच. आता कोरोनाने अधिक आक्राळविक्राळ रूप धारण केल्याने अखेर यंदाची आयपीएल स्पर्धा स्थगित करण्यात आली. बीसीसीआयचे राजीव शुक्ला यांनी ही माहिती दिली.
कोलकाता नाइट रायडर्सच्या दोन खेळाडूंना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्जमधील सपोर्ट स्टाफमधील एकाला कोरोनाची लागण झाली होती. या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने कालची कोलकाता आणि बेंगळुरू ही लढत स्थगित केली होती. तर आज सकाळी उद्या होणारी चेन्नई आणि राजस्थान ही लढत स्थगित केली होती. दरम्यान बीसीसीआय आयपीएलचे सामने मुंबई खेळवणाच असे वृत्त समोर आले होते. पण त्याविरोधात देखील मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.
आयपीएलच्या 14 व्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्सच्या दोन खेळाडूंना सोमवारी कोरना झाल्याचे समोर आले होते. तर मंगळवारी सकाळी सनरायझर्स हैदराबादचा फलंदाज आणि विकेटकिपर वृद्धीमान सहा याला देखील कोरोना झाल्याचे आढळले. हैदराबाद संघातील तो एकमेव खेळाडू आहे ज्याला करोनाची लागण झाली आहे. अन्य खेळाडूंची टेस्ट नेगेटिव्ह आल्याचे सूत्रांनी सांगितले.
देशात गेल्या काही दिवसात देशात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशात आयपीएलच्या बायो बबलमध्ये राहणार्यांना कोरोना झाल्याने काळजी वाढली होती. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी मंगळवारी एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, आयपीएल स्थगित करण्यात आले आहे. स्पर्धा पुन्हा कधी होणार याचा आम्ही विचार करतोय. पण सध्या तरी स्पर्धा रद्द करण्यात आली आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |