वाई : येथील महागणपती घाटावर गणपती मंदिरासमोर असलेल्या काशिविश्वेश्वर मंदिराच्या विहिरीत गाळ काढताना सतराव्या शतकातील कट्यार व खंजीर ही शस्त्रे आढळून आली. ही शस्त्रे पोलिसांनी ताब्यात घेतली असून ती पुरातत्व विभागाकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत.
याबाबत अधिकमाहिती अशी, वाई येथील महागणपती मंदिरालगतच्या काशीविश्वेश्वर मंदिर परिसरात फरसबंदी पुरातन आडवजा विहीर आहे. त्यात मोठा पाणी साठा असतो. या विहिरीतील पाण्याचा अनेक वर्षात उपसा बंद असल्याने व देखभाली अभावी पाण्याला दुर्गंधी येत होती. मंदिराचे ट्रस्टी शैलेंद्र गोखले यांनी आडाची स्वच्छता करण्याच्या हेतूने गाळ काढण्यास मागील पंधरा दिवसांपासून सुरुवात केली आहे. शुक्रवारी (दि.१८) रोजी गाळ काढत असताना विहिरीत सात कट्यार आणि एक खंजीर आढळून आला.
याबाबतची माहिती पोलीस उपअधीक्षक डॉ. शीतल जानवे-खराडे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांना मिळाली. त्यांनी तत्काळ मंदिर परिसरात भेट देऊन पंचनामा करून शस्त्रे ताब्यात घेतली. याबाबत पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजय बोऱ्हाडे, तहसीलदार रणजित भोसले व सातारा येथील शिवाजी महाराज संग्रहाला कळविण्यात आले.
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |

साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |