05:08pm | Apr 11, 2021 |
सातारा : खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी लॉकडाऊन विरोध करण्यासाठी घेतली भूमिका या खर्या अर्थाने समाजातील सर्व नागरिकांच्या भावना आहेत. खरंच कोरोना आहे का? हा प्रश्न वर्षभरापासून नागरिकांना छळत आहे. त्या भावनांचा कडलोट होण्याची वेळ आली असून त्याच भावना मांडत खासदार उदयनराजे भोसले यांनी लॉकडाऊनला विरोध करण्याची भूमिका मांडली. त्याला आमचा पाठिंबा असल्याचे दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे कृती समितीचे संस्थापक-अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी म्हटले आहे.
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात चव्हाण यांनी म्हटले आहे की, एक वर्षांपासून सगळयांचे जीवन हैराण झालेय. त्यात अधिक झळ बसली आहे ती भटकेविमुक्त, तमाशा कलावंत, रोजंदारी करणारे कष्टकरी, छोटे रस्त्यावर विक्री करणारे विक्रेते, रस्त्यावर जीवन जगणारे पारधी, असंख्य ठिकाणी झोपडीत राहून जीवन कंठत असलेली माणसे यांना. दररोज कष्ट केले तरच घरात चूल पेटणार अशांनी काय लॉकडाऊनमुळे काम नसल्यानंतर काय करायचे याचे उत्तर ना सरकारकडे आहे ना समाजाकडे आहे.
कोरोना हा रोग मुळात आहे की नाही अशी शंका वाटावी असे वातावरण आणि घटना आजुबाजुला घडत असताना साथरोग नियंत्रण कायदा लावून केंद्र व राज्य सरकारने जनतेला वेठीस धरले आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्या म्हणण्यानुसार कोरोनाबाबत मेडिकल सायन्समधील शास्त्रज्ञांना ठरवूद्या हा मुद्दा रास्त आहे. मध्यंतरीच्या काळात टेस्टिंग कमी केल्यानंतर कोरोनाचा जोर ओसरत चालला होता. त्या काळात जिल्हयात कोठेही कोणी कोरोना झाल्याने तडफडून मृत्यू पावल्याचे उदाहरण नाही.
लोकांच्या मनातील भीती कमी झाल्याने लोक पुन्हा उदरनिर्वाहाच्या कामाला लागले होते. तर अनेकांच्या नोकर्या गेल्याने तर काही युवकांनी नोकर्या नसल्याने आत्महत्या केल्याच्या घटना जिल्हयात घडलेल्या आहेत. कोरोनापेक्षा जगणे आणि रोजगार हे खूप महत्वाचे असताना जिल्हयात पुन्हा तपासणींचा वेग वाढवण्यात आल्यानंतर ज्या प्रकारे कोरोना बाधितांची आकडेवारी सांगितली जात आहे. त्यामध्ये 80 टक्के माणसे होम आयसोलेट आहेत. जर काहीच लक्षणे नसतील तर त्याला महामारी कसे म्हणता येईल, असा साधा प्रश्न विचारण्याची धमक खासदार उदयनराजे भोसले यांनी दाखवली असून बाकीचे सर्व पक्षाचे लोकप्रतिनिधी यावर काहीच बोलण्यास तयार नाहीत.
आज पाठिंबा आंदोलन करणार
छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज असलेले खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर भीकमांगो आंदोलनाची वेळ आणणार्या महाविकास आघाडी शासनाचा निषेध करण्यासाठी व खासदार उदयनराजे भोसले यांच्या लॉकडाऊन नकोच या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी दलित महासंघ व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे कृती समितीतर्फे सोमवार दि. 12 रोजी मी व मोजकेच कार्यकर्ते सातारा नगरपालिकेच्या समोर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयासमोर धरणे आंदोलन करणार असल्याचे उमेश चव्हाण यांनी पत्रकात म्हटले आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |