सातारा : जिल्ह्यात आजपासून लॉक डाऊनमध्ये शिथीलता दिल्यानंतर आज सकाळी जावली तालुक्यातील 58 वर्षीय कोरोना बाधितासह दोन महिन्याचा चिमुरडा तसेच इतर दोन कोरोना अनुमानितांचा मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
जावली तालुक्यातील 58 वर्षीय व्यक्तीवर कोरोना बाधित निष्पन्न झाल्याने त्याच्यावर गेल्या काही दिवसांपासून कराड येथील कृष्णा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु होते. संबंधित व्यक्तीला मधुमेह तसेच श्वसनसंस्थेचा तीव्र जंतुसंसर्ग झाला होता. त्यामुळेच त्याचा कोरोना तसेच वरील आजाराने मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली आहे. तसेच वरळी, मुंबई येथील 64 वर्षीय महिला पाचगणी येथे आली होती. त्यामुळे तिला महिला गृह विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. असे असताना आज सकाळी या महिलेचा दम्याच्या आजाराने व हृदयविकाराने मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली असून कोरोना अनुमानित असल्याने या महिलेच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. श्वसनाचा त्रास होत असल्याने घाटकोपर मुंबई येथून आलेल्या दोन महिन्याच्या बाळाला कोरोना अनुमानित म्हणून कृष्णा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, आज सकाळी त्या बाळाचा मृत्यू झाला. कोरोना अनुमानित असल्याने त्या बाळाच्या घशातील स्त्रावाचे नमुनेही तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. नांदलापूर, ता. कराड येथील साठ वर्षीय महिलेला काही दिवसांपूर्वी कोरोना अनुमानित म्हणून कृष्णा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, त्या महिलेचाही आज सकाळी मृत्यू झाला आहे. तिच्याही घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. वरील मृत तिघे कोरोना अनुमानित असल्याने कोरोना तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतरच त्यांच्या मृत्यूचे कारण समोर येणार आहे. तत्पूर्वी आज एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधित मृतकांची संख्या 5 झाली आहे, तर कोरोना बाधित व्यक्तींची संख्या 201 झाली आहे. 106 रुग्ण कोरोनातून खडखडीत बरे होवून घरी गेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची रुग्णसंख्या 90 आहे.
146 जणांचे अहवाल आले निगेटिव्ह
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 34, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 53, ग्रामीण रुग्णालय, वाई येथील 9, ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील 15 असे एकूण 111 जणांचे अहवाल निगेटिव्ह. तसेच कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 35 जणांचे असे एकूण 146 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचेही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.
दि. 21 रोजी रात्री उशिरा क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 22, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 87 असे एकूण 109 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. घशातील स्त्रावांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे.
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |