08:41pm | Apr 06, 2021 |
सातारा : खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह जाळणार्या मुख्य आरोपीसह तीन जणांना पोलिसांनी तीन तासांत जेरबंद केले. आकाश उर्फ रॉजर राजेंद्र शिवदास खून झालेल्या इसमाचे नाव असून विक्रांत उर्फ मन्या उमेश कांबळे असे ताब्यात घेण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे. मुख्य आरोपीसह आणखी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, दि. 6 एप्रिल रोजी सकाळी 09.30 वा. चे सुमारास सातारा शहरातील खंडोबाचा माळ येथे एक जळालेल्या अवस्थेमधील मृतदेह आढळून आला. त्याबाबत माहिती प्राप्त झाल्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून जिल्हा पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलीस अधीक्षक आँचल दलाल, सातारा, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ सातारा तसेच अधिकारी व स्टाफ यांनी घटनास्थळी तात्काळ भेट दिली. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर प्रथमदर्शनी कोणत्यातरी अज्ञात इसमाचा खून करुन त्याचा मृतदेह जाळून पुरावा नाहीसा केल्याचे निदर्शनास आले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर परीसरातील साक्षिदार यांचेकडे विचारपुस करुन तसेच गोपनिय माहिती प्राप्त करुन मयत इसम हा आकाश राजेंद्र शिवदास, रा.रामनगर, ता.जि.सातारा हा असल्याचे निष्पन्न केले. त्यानंतर नमुद मयताचे कोणाशी वैर अगर भांडणतंटे आहेत काय याची माहिती घेवून संशयितांना ताब्यात घेवून विचारपुस केली असता, त्यांनी मयत आकाश उर्फ रॉजर राजेंद्र शिवदास हा विक्रांत उर्फ मन्या उमेश कांबळे याचे बहिणीस त्रास देत होता या कारणावरुन चिडुन जावुन त्यास दि.6 एप्रिल रोजी मध्यरात्री खंडोबाचा माळ येथे डोक्यात दगड टाकुन त्याचा खुन करुन त्याचा मृतदेह जाळून टाकला असल्याचे सांगितले.
जिल्हा पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या सूचनांप्रमाणे सहायक पोलीस अधीक्षक आँचल दलाल, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, आनंदसिंग साबळे, पोलीस उपनिरीक्षक मदन फाळके, स..जोतिराम बर्गे, उत्तम दबडे, पो.हवा.कांतीलाल नवघणे, अतिश घाडगे, संतोष पवार, संजय शिर्के, विजय कांबळे, संतोष सपकाळ, पो.ना.शरद बेबले, साबीर मुल्ला, प्रविण ङ्गडतरे, निलेश काटकर, गणेश कापरे, मुनीर मुल्ला, प्रविण पवार, अमित सपकाळ, पो.कॉ.रोहित निकम, सचिन ससाणे, विशाल पवार, मोहसिन मोमीन, वैभव सावंत, गणेश कचरे, पंकज बेसके यांनी ही कारवाई केलेली आहे. गुन्हयाच्या तपासामध्ये सिव्हील हॉस्पीटलचे वैद्यकिय अधिकारी डॉ.राहुल खाडे यांनी सहकार्य केले आहे.
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |