08:50pm | Oct 26, 2021 |
सातारा : सातारा जिल्ह्यातील विविध नगरपालिकांमध्ये नोकरीत कार्यरत असताना निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांनी सन 2004 पासून ते 2021 पर्यंत अनुकंपा तत्वाखाली पालिकांच्या सेवेत सामावून घेण्यासाठी अर्ज केलेले असताना अद्याप त्यांना न्याय न मिळाल्याने कराड, वाई, सातारा, म्हसवड, महाबळेश्वर पालिकांमध्ये अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे.
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील विविध नगरपालिकांमध्ये सेवेत असताना निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वाखाली नोकरी मिळण्यासाठी विनंती अर्ज केलेले आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्तावही सादर करण्यात आलेले असून त्यानुसार अनुकंपा नियुक्ती उमेदवारांची प्रतिक्षा सुचीही तयार करण्यात आलेली आहे.
त्यानुसार सातारा जिल्हय़ातील विविध पालिकांमध्ये वर्ग 3 मधील 17, वर्ग 4 मधील 69 कर्मचारी अनुकंपा नियुक्तीसाठी पात्र आहेत. 18 मार्च 2021 च्या पत्रानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी रिक्त असलेल्या पदासाठी नगरपरिषदांना नावे कळवून संबंधित मुख्याधिकाऱ्यांनी अनुकंपा तत्वावर नियुक्तीचे आदेश निर्गमित करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, ही नियुक्ती सुची अद्यापही प्रलंबित आहे.
यातील अनेक कर्मचारी 2004 ते 2021 या कालावधीत अर्ज केलेले आहेत. त्यातील काहींना अद्याप नोकरी न मिळाल्याने त्यांची वये वाढत असून त्यांना वेळेत अनुकंपा तत्वावर नियुक्ती न दिल्यास पुन्हा त्यांना कोठेही नोकरी मिळणार नाही. आदेश देवून वर्षभराचा कालावधी लोटला तरी नियुक्ती न दिल्याने शेवटी या उमेदवारांनी आमरण उपोषण सुरु केले आहे.
यामध्ये कराड पालिकेत अर्ज केलेले शाम थोरवडे, शुभम कांबळे, संदीप कांबळे, अमित थोरवडे, धीरसिंग चावरे, नागेश गोसावी, किरण माने, वाई पालिकेत अर्ज केलेले राहूल लाखे, प्रमोद जाधव, महेश लाड, वैभव कळके, जगदीश मुळे, सातारा पालिकेत अर्ज केलेले कैलास अडागळे, अनिल बडेकर, संतोष माने, संदीप घाडगे, सतीश माने यांनी उपोषणात सहभाग घेतला आहे.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |