सातारा : विविध गुन्हे दाखल असल्याने सातार्यातून तडीपार केले असतानाही तडीपारी आदेशाचे उल्लंघन करुन फिरणार्या अनिल सुरेश धांडे (रा.मोळाचा ओढा, सातारा) याला शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेवून अटक केली. दरम्यान, संशयित धांडे याला आठ दिवसांपूर्वीच तडीपार करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, संशयित अनिल धांडे याच्याविरुध्द शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्याच्यामध्ये सुधारणा होत नसल्याने शाहूपुरी पोलिसांनी त्याच्या तडीपारीचा प्रस्ताव तयार करुन तो पोलिस मुख्यालयात पाठवला. दि. 30 रोजी सातारा जिल्ह्यातील अनेक टोळ्या तडीपार करण्यात आल्या. यामध्ये अनिल धांडे याचाही समावेश होता. तडीपारीमुळे त्याने सातारा सोडणे आवश्यक होते. मात्र तो सातार्यात खुलेआम फिरत होता.
याबाबतची माहिती शाहूपुरी पोलिसांना समजल्यानंतर पोलिसांचे एक पथक तयार करण्यात आले. दि. 4 रोजी मोळाचा ओढा येथील आझादनगरमध्ये येथे संशयित असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला घटनास्थळी शोधण्यास सुरुवात केली. पोलिस आल्याचे पाहून संशयिताने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेवून त्याच्याविरुध्द तडीपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणीचा गुन्हा दाखल केला. सपोनि विशाल वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संदीप शितोळे, पोलिस हवालदार लैलेश फडतरे, अमित माने, स्वप्नील कुंभार, ओंकार यादव, मोहन पवार, पंकज मोहिते यांनी कारवाईत सहभाग घेतला
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |