05:03pm | Jun 10, 2022 |
मुंबई : भाजपच्या दोन प्रवक्ते-नेत्यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ देशभरात आज मुस्लीम समाज आणि विविध पक्षाच्यावतीने आंदोलन करण्यात येत आहे.
शुक्रवारच्या नमाजनंतर देशातील अनेक शहरांमध्ये निदर्शने होत आहेत. दिल्लीतील जामा मशिदीबाहेर जोरदार निदर्शने सुरू आहेत. तर उत्तर प्रदेशातील अनेक शहरांमध्येही शुक्रवारच्या नमाजानंतर मोठ्या संख्येने मुस्लीम समाजातील लोकं आंदोलनाच्या ठिकाणी जमा झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच प्रयागराजमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर पोलिसांवर दगडफेक करण्यात आल्याच समोर आलं आहे. उत्तर प्रदेशातील शहरांमध्ये झालेल्या गदारोळानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गैरप्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
प्रयागराजमध्ये परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त पाठवण्यात आला आहे. डीजीपी डीएस चौहान, कायदा आणि सुव्यवस्थाचे प्रमुख प्रशांत कुमार आणि अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) अवनीश अवस्थी हे लखनऊ पोलिस मुख्यालयाच्या नियंत्रण कक्षात उपस्थित आहेत. प्रयागराजमध्ये अधूनमधून दगडफेकीच्या घटना घडत आहेत. जाळपोळही झाली आहे. दगडफेकीत अनेक पोलीस जखमी झाले. त्यामुळे यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहे.
महाराष्ट्रात ठिक-ठिकाणी जमाव...
दिल्ली आणि उत्तर प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा अनेक ठिकाणी आंदोलन सुरु आहे. औरंगाबाद, सोलापूर, जालना आणि कोल्हापुरात मुस्लीम समाज रस्त्यावर उतरताना पाहायला मिळत आहे. औरंगाबादमध्ये जलील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु आहे. तर सोलापुरात सुद्धा हजारोच्या संख्येने आंदोलक रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळत आहे. सर्वच ठिकाणाचा जमाव पाहता पोलिसांचा बंदोबस्त कमी पडत असल्याचे चित्र आहे. तर आंदोलनाला एवढी गर्दी होईल याचा पोलिसांना अंदाज आला नसल्याचे बोलले जात आहे.
महाराष्ट्रात ठीक-ठिकाणी जमाव...
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |