05:22pm | Sep 08, 2021 |
कोरेगाव : ल्हासुरणें ता.कोरेगाव येथील रामोशीवस्ती ते जिल्हा परिषद शाळेपर्यत झालेला काँक्रीट रस्ता टेंडरमध्ये दिलेल्या निकषानुसार झाला नसून हे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे . या रस्त्याच्या कॉंक्रीटची जाडी २ ते ३ इंचानी कमी झाली आहे असा अहवाल चौकशीनंतर अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कोरेगाव यांनी दिला असून आता दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आमची मागणी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे सरचिटणीस रमेश उबाळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात रमेश उबाळे यांनी म्हटले आहे, ल्हासुरणें येथील रामोशीवस्ती ते जिल्हा परिषद शाळेपर्यंत झालेला रस्ता टेंडरमधील निकषानुसर होणे आवश्यक होते परंतु या रस्त्याची जाडी दोन ते तीन इंचानी कमी आहे. सात वेगवेगळ्या संस्थाना या कॉंक्रीट रस्त्याचे काम दिले असताना हे काम एकाच काँट्रॅक्टरने केले आहे. एकाच काँट्रॅक्टरला काम दिले असले तरी या कामाचे ई टेंडरिंग करून काम का देण्यात आले नाही. सात टेंडर मंजूर करण्यात आली आहेत ही टेंडर आमदारांच्या शिफारशीवरून देण्यात आली आहेत का? असा सवालही रमेश उबाळे यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे केला आहे.
एकाच काँट्रॅक्टरने केलेले काम व कॉंक्रीटची जाडी दोन ते तीन इंचानी कमी करून यातील पैसे टक्केवारीसाठी दिले आहेत का? तसेच याचीही चौकशी झाली पाहिजे. सदर कामे कुणाच्यातरी शिफारशीवरून दिली गेली आहेत का? यामध्ये कॉन्ट्रॅक्टर व या कामावर देखरेख करणारी शासकीय यंत्रणा, शासकीय कर्मचारी व आधिकारी यांच्यामध्ये काही आर्थिक देवाण-घेवाण झाली आहे का? याची चौकशी करा. कॉंक्रीटीकरण केलेला रस्ता तीन महिन्यात कसा काय खराब झाला निकृष्ट कामाची फेर तपासणी करण्यात यावी क्वालिटी कंट्रोलने दाखवीलेल्या कागदपत्रात व प्रत्यक्ष झालेला रस्ता यामध्ये नक्कीच काही तरी आर्थिक देवाण घेवाण झाल्यासारखे दिसते याचीही चौकशी करण्यात यावी. सदर कॉंक्रीट रस्त्याचे काम शिफारस दिलेले अभियंता, उपअभियंता, कामाची पाहणी करणारे रावसाहेब, संस्था संस्थेने दिलेला काँट्रॅक्टर यांनी शासनाचे आर्थिक नुकसान केले आहे व निकृष्ट दर्जाचा रस्ता तयार करून शासनाची फसवणूक केली आहे. शासनाच्या पैशाचा गैरवापर केला असून या सर्वांवर फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आमची मागणी आहे.
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |