11:05pm | Sep 21, 2020 |
सातारा : सोमवारी जिल्ह्यात तब्बल 40 बाधितांचा मृत्यू झाला, तर 690 बाधित निष्पन्न झाले. तसेच 875 नागरिकांना कोरोनातून बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला असून 985 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
रविवार पाठोपाठ सोमवारही सातारा जिल्ह्यातील नागरिकांसाठी घातवार ठरला. सोमवारी तब्बल 40 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने जिल्हा शहारला आहे. या 40 जणांच्या मृत्यूमुळे जिल्ह्यातील कोरोनाबळींचा आकडा 900 पार म्हणजेच 906 वर पोहोचला आहे. सोमवारी 690 बाधित निष्पन्न झाल्याने जिल्ह्यातील बाधितांची संख्या 31 हजारांचा आकडा पार करीत 31 हजार 514 वर पोहोचली आहे. तसेच जिल्ह्यातील विविध रुग्णालये, कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 875 नागरिकांना घरी सोडण्यात आल्याने जिल्ह्यातील कोरोनामुक्तांची संख्या 21 हजार 125 वर पोहोचली आहे. याचबरोबर 985 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याचीही माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
40 बाधितांचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्या जवळवाडी ता. जावली येथील 65 वर्षीय पुरुष, नागठाणे ता. सातारा येथील 43 वर्षीय पुरुष, सैदापूर ता. कराड येथील 20 वर्षीय महिला, वेळे ता. वाई येथील 65 वर्षीय महिला, शेदुरजणे ता. वाई येथील 50 वर्षीय पुरुष, पाडळी ता. सातारा येथील 65 वर्षीय महिला, अंबावडे ता. सातारा येथील 59 वर्षीय महिला, पाली ता. पाटण येथील 60 वर्षीय पुरुष, चिंचणेर ता. सातारा येथील 65 वर्षीय पुरुष, नुने ता. सातारा येथील 65 वर्षीय पुरुष, मेढा ता. जावली येथील 64 वर्षीय महिला तसेच जिल्ह्यातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्यांमध्ये चिखली ता. खटाव येथील 80 वर्षीय पुरुष, करंजे पेठ अंबवडे ता. सातारा येथील 52 वर्षीय पुरुष, आसळे ता. वाई 68 वर्षीय पुरुष, गुळुंब ता. वाई येथील 70 वर्षीय पुरुष, काले ता. कराड येथील 71 वर्षीय पुरुष, गोडसेवाडी कोळेवाडी ता. माण येथील 70 वर्षीय पुरुष, कुंठे ता. फलटण येथील 65 वर्षीय पुरुष, शाहुनगर सातारा येथील 57 वर्षीय पुरुष, कोरेगाव येथील 42 वर्षीय पुरुष, बार्गेवाडी खेड सातारा येथील 72 वर्षीय महिला, वाठार स्टेशन ता. कोरेगाव येथील 65 वर्षीय पुरुष, बावडा ता. खंडाळा येथील 65 वर्षीय पुरुष, बुरुड गल्ली ता. फलटण येथील 70 वर्षीय महिला, पडेगाव ता. खटाव येथील 80 वर्षीय पुरुष, राजाचे कुर्ले ता. खटाव येथील 65 वर्षीय पुरुष, मायणी येथील 85 वर्षीय महिला, शेंद्र ता. सातारा येथील 72 वर्षीय पुरुष, गोळेश्वर ता. कराड येथील 44 वर्षीय पुरुष, अंबवडे ता. कोरेगाव येथील 62 वर्षीय पुरुष, तर उशिरा कळविलेले रविवार पेठ सातारा येथील 65 वर्षीय पुरुष, रेठरे बु ता. कराड येथील 47 वर्षीय पुरुष, मोपर्डे ता. कराड येथील 25 वर्षीय पुरुष, येळगाव ता. कराड येथील 55, कराड येथील 60 वर्षीय महिला, सोमवार पेठ कराड येथील 70 वर्षीय पुरुष, कडेगाव जि. सांगली येथील 29 वर्षीय महिला, रेठरे खुर्द येथील 92 वर्षीय पुरुष, वाटसळनगर कराड येथील 55 वर्षीय महिला, आगाशिवनगर ता. कराड येथील 1 अशा एकूण 40 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
985 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 54,उपजिल्हा रुग्णालय कराड 26, उपजिल्हा रुग्णालय फलटण 46, कोरेगाव 82, वाई 141, खंडाळा 82, रायगांव 98, पानमळेवाडी 40, मायणी 53, महाबळेश्वर 30, पाटण 27, दहिवडी 64, तळमावले 35 व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड 207 असे एकूण 985 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत,अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |