10:45pm | Sep 27, 2020 |
सातारा : रविवारी जिल्ह्यात 469 बाधितांची नोंद झाली, तर 19 जणांचा कोरोनाने उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच कोरोनातून बरे झालेल्या 513 नागरिकांना डिस्चार्ज देण्यात आला असून 181 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
काही दिवसांतील जिल्ह्यात वाढता मृत्यूदर हा नागरिक तसेच प्रशासनाच्या काळजाचा ठाव चुकवणारा ठरत होता. मात्र, रविवारी 19 बाधितांच्या दुर्दैवी मृत्यूने प्रशासनाला दिशा मिळाल्याचे जाणवले. 19 बाधितांच्या मृत्यूमुळे जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या 1079 वर पोहोचली आहे, तर 469 बाधित निष्पन्न झाल्याने कोरोनाबाधितांचा आकडा 35 हजार 881 वर पोहोचला आहे. तसेच जिल्ह्यातील विविध रुग्णालये, कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 513 नागरिकांना कोरोनातून ठणठणीत बरे झाल्याने घरी सोडण्यात आल्याने जिल्ह्यातील कोरोनामुक्तांचा आकडा 25 हजार 514 वर पोहोचला असून 181 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याचीही माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
19 बाधितांचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलल्या अपशिंगे सातारा येथील 48 वर्षीय महिला, डाळमोडी ता. खटाव येथील 29 वर्षीय महिला, देशमुखनगर खोजेवाडी ता. सातारा येथील 65 वर्षीय महिला, करंजे सातारा येथील 65 वर्षीय पुरुष, रविवार पेठ सातारा येथील 73 वर्षीय पुरुष, तसेच खाजगी हॉस्पिटलमधील खातगुण ता.खटाव येथील 68 वर्षीय पुरुष, गोरेगाव निम ता. खटाव 78 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ सातारा येथील 86 वर्षीय महिला, शुक्रवार पेठ कराड येथील 58 वर्षीय पुरुष, लोणंद ता. खंडाळा येथील 55 वर्षीय पुरुष, देवापुरी ता. माण येथील 54 वर्षीय पुरुष, तसेच उशिरा कळविलेले पळशी ता. कोरेगा येथील 65 वर्षीय महिला, शनिवार पेठ कराड येथील 53 वर्षीय महिला, शिरवडे ता. कराड येथील 70 वर्षीय पुरुष, कोपर्डे हवेली ता. कराड येथील 58 वर्षीय महिला, उंब्रज ता. कराड येथील 65 वर्षीय पुरुष, कराड येथील 48 वर्षीय पुरुष, पसरणी ता. वाई येथील 38 वर्षीय पुरुष, देगाव ता. सातारा येथील 75 वर्षीय पुरुष असे एकूण 19 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
181 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
फलटण येथे 52, खंडाळा येथे 58, रायगाव येथे 49, पानमळेवाडी 17, महाबळेश्वर 5 असे एकूण 181 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |