12:04am | Jul 02, 2020 |
फलटण : निंबळक ता. फलटण गावच्या हद्दीत एका अज्ञात महिलेचा खून करून तिचा मृतदेह विहिरीत फेकल्याची घटना बुधवार दि. १ जुलै रोजी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे फलटण तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी जावून मृतदेहाचा पंचनामा केला असून, अज्ञात संशयित आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा नोंद केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बुधवार दि. १ जुलै रोजी दुपारी निंबळक गावचे पोलीस पाटील समाधान कळस्कर यांना वाजेगाव ता. फलटण येथील पोलीस पाटील प्रकाश बनकर यांनी भ्रमणध्वनीवरून फोन करून निंबळक गावच्या हद्दीमध्ये एका विहिरीमध्ये अज्ञात महिलेचा खून करून तिचा मृतदेह टाकला असल्याची माहिती दिली. यानंतर कळसकर व बनकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता एका लाल रंगाच्या चादरीमध्ये मानवी मृतदेह दोरीने बांधलेल्या स्थितीमध्ये असल्याचे निदर्शनास आले. यानंतर पोलीस पाटील कळसकर यांनी याबाबतची माहिती फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांनी विहिरीतील मृतदेह बाहेर काढून मृतदेहाचा पंचनामा केला. सदर मृतदेह वीस ते पंचवीस वर्षे वयाच्या महिलेचा असून त्या मृतदेहावर काळ्या रंगाची पॅन्ट व गुलाबी रंगाचे टी-शर्ट आहे. याबाबत पोलिसांनी पंचक्रोशी मध्ये विचारपूस केली असता, तो मृतदेह कोणीच्याही ओळखीचा नसल्याचे पोलिसांना नागरिकांनी सांगितले. त्यामुळे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्या महिलेचा खून करून तिचा मृतदेह फलटण तालुक्यात आणून विहिरीत टाकल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. याबाबत सोलापूर पुणे जिल्ह्यातील बेपत्ता असलेल्या महिलांबाबत माहिती घेतली जात आहे. याप्रकरणी निंबळक गावचे पोलीस पाटील समाधान महादेव कळसकर यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा नोंद केला आहे. याबाबत अधिक तपास फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन सावंत करीत आहेत.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |