03:40pm | Nov 24, 2020 |
फलटण: फलटण वीज महावितरणचा कारभार चुकीचा असल्याची तक्रार बारामती वीज महावितरण विभागाचे मुख्य अभियंता सुनिल पावडे यांच्याकडे केल्यानंतर याबाबत त्यांनी माहिती घेवून शेतकर्यांकडून डीपीसाठी घेऊ नका असे सक्त आदेश दिले असल्याची माहिती फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी दिली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, फलटण तालुका वीज महावितरणकडे रिडींग घेण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही. त्यामुळे वीजबीलेही अंदाजे, खोटी व बोगस आकारली जातात. बीलेसुद्धा शेतकर्यांना दिली जात नाहीत. त्यामुळे वर्षानुवर्षे वीज महावितरणचा कर्मचारी शेतकर्यांकडे वीज बील मागण्यासाठी जात नाही. फलटण तालुक्यात डिपी चोरीला जाण्याचे व नादुरुस्त होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. ज्यावेळी डिपी चोरीला जाईल किंवा नादुरुस्त होईल, त्यावेळी फलटण वीज महावितरण शेतकर्यांची अनधिकृतपणे वीजबील भरण्यासाठी अडवणुक करत असे. प्रत्येक शेतकर्याला पाच हजार रुपयापर्यंत वीजबील भरण्यासाठी सांगत असत. डिपीवरील सर्व शेतकर्यांचे पैसे गोळा होईपर्यंत दीड-दोन महिने जायचे. दीड-दोन महिन्याच्या कालावधीत शेतकर्यांच्या शेतपीकाचे लाखो रुपयांचे नुकसान होत असे. अशा स्वरूपाच्या गंभीर तक्रारी शेतकर्यांकडुन शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांचेकडे येत असत. अशाप्रकारे कित्येक वर्षांपासून फलटण तालुक्यातील वीज महावितरणकडुन शेतकर्यांची होणारी आर्थिक पिळवणूक, मानसिक छळ व डिपी बसवण्यास होणार्या दिरंगाईमुळे शेतपीकाचे होणारे लाखो रुपयांचे नुकसान फलटण तालुका शिवसेनेच्या दीर्घ पाठपुराव्यामुळे थांबणार असल्याचे शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी सांगितले आहे.
फलटण तालुका वीज महावितरणच्या चुकीच्या कार्यप्रणालीचा पाढाच बारामती वीज महावितरण विभागाचे मुख्य अभियंता सुनिल पावडे यांना वाचुन दाखवला. फलटण तालुक्यातील शेतकर्यांची जुल्मी पद्धतीने होणारी आर्थिक पिळवणूक, मानसिक छळ, लाखो रुपयांचे शेतपीकाचे होणारे नुकसान याची संपुर्ण पुराव्यानिशी माहिती सुनिल पावडे यांना समजावून सांगितली.
त्यानुसार बारामती वीज महावितरण विभागाचे मुख्य अभियंता सुनिल पावडे यांनी फलटण तालुका वीज महावितरणला याबाबत विचारणा करुन डिपी नादुरुस्त झाला अथवा चोरीला गेल्यावर कोणत्याही प्रकारे पैशाची मागणी न करता तात्काळ डिपी देऊन वीजपुरवठा सुरळीत करुन देण्याचे सक्त आदेश दिले आहेत. अशाप्रकारची सविस्तर माहिती सुनिल पावडे यांनी मोबाईलद्वारे दिली असल्याचे शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी स्पष्ट सांगितले.
तसेच शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी फलटण तालुक्यातील शेतकर्यांना विनंती केली आहे की, डिपी बसवण्यासाठी यापुढे कोणीही अनधिकृतपणे पैसे देऊ नयेत. शेतकर्यांनी याबाबत जागरुक रहावे. वीज महावितरणने विनामूल्य डिपी बसवणे बंधनकारक आहे. जर वीज महावितरणच्या अधिकारी वा कर्मचारी यांचेकडुन कोणी पैशाची मागणी केली तर शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांचेकडे 8600138961 किंवा 7774096430 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. जेणेकरून वीज महावितरणच्या संबंधित अधिकारी वा कर्मचार्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आवाहनही शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांचेकडुन करण्यात आले आहे.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |