10:01pm | Dec 09, 2020 |
फलटण : फरांदवाडी येथील वृंदावन सिटीचा अवैध बिनशेती परवाना रद्द करण्यासाठी व रस्त्यासाठी वापरण्यात आलेल्या मुरुमाच्याबाबत कारवाई करण्याबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर गट) फलटण यांच्या वतीने तहसीलदार समीर यादव यांना निवेदन देण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महसूल विभाग व नगर विकास विभाग यांच्याकडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर गट) फलटण तालुका अध्यक्ष संजय गायकवाड यांनी निवेदनाद्वारे तक्रार दाखल केली असून या निवेदनात, फरांदवाडी गट क्र ९१ मधील "वृंदावन सिटी" या प्रोजेक्ट मध्ये रस्त्यासाठी वापरण्यात आलेल्या अंदाजे १००० ब्रास मुरुमाबाबत परवानगी घेण्यात आलेली आहे का? तसेच त्यांची रॉयल्टी भरण्यात आली आहे का? याबाबत चौकशी करावी. मुरुमाबाबत परवानगी घेण्यात आली नसल्यास अवैध मुरुमाबाबत पंचनामा करावा व शासकीय नियमानुसार दंड वसूल करण्यात यावा तसेच अवैध मुरुम वाहतुक करणाऱ्या गाड्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
"वृंदावन सिटी" हा प्रोजेक्ट सुरू असलेला गट आर.पी.झोन मध्ये शेती विभागात मोडत असून ८१ व्यावसायीक प्लॉट विक्री करता नियमबाह्यपणे पाडण्यात आले असून जिल्हाधिकारी, नगर रचना कार्यालय तसेच प्रांत कार्यालय, तहसीलदार कार्यालय यांच्याकडून कोणत्याही प्रकारची प्लॉट पाडण्याची कोणत्याही प्रकारची पुर्व परवानगी न घेता ८१ व्यावसायीक विक्री करता प्लॉट पाडून विक्री सुरु असून यातील प्लॉटची विक्री व दस्ताच्या नोंदी थांबवण्यात याव्यात याबाबत संबंधित विभागास आदेश देण्यात यावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे.
नागरीकांचा फसवणूक करणाऱ्या प्रोजेक्टला विरोध असुन महाराष्ट्र प्रादेशीक नियोजन व नगररचना अधिनीयम व जमीन महसूल अधिनीयम तरतूदी व नियमाच्या विरोधात जाऊन अनधिकृतपणे नगर रचना कार्यालयाची व प्रादेशीक नगर रचना नियोजन समीतीची परवानगी न घेता जमीनीचे तुकडे करण्यात आले आहेत. सदरचा गट आर.पी. झोन मध्ये मोडत असून याठिकाणी शेती झोन असताना तत्कालीन तहसीलदार आर.सी. पाटील यांनी ४२ ड प्रमाणे फरांदवाडी गावास गावठाण नसताना फरांदवाडी गावात मोडणाऱ्या ऊळुब पुनवर्सन गावठाणचा चुकीचा नियम वापरत २०० मीटर अंतर्गत नियमबाह्य तसेच बेकायदेशीर बिनशेती परवानगी दिली असून याबाबत बिनशेतीची चौकशी करुन बिनशेती आदेश रदद करण्यात यावा.
गावठाणचा २०० मीटर अंतर्गत चुकीचा अभीप्राय व ना- हरकत दाखला नियमबाहय तसेच बेकायदेशीर पद्धतीने देणाऱ्या मंडलाधिकारी फलटण व उप अधिक्षक भुमी अभिलेख फलटण याची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करावी. सर्व बाबीची चौकशी करुन कारवाई करावी. तक्रार अर्ज देऊनही नागरीकांची फसवणुक झाल्यास जबाबदार महसुल अधिकारी यांना दोषी धरुन न्यायालीन दाद मागण्यास व आंदोलन करण्यास भाग पाडु नये, असेही निवेदनात म्हटले आहे.
हे निवेदन तहसीलदार समीर यादव यांना देण्यात आले आहे. निवेदनावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर गट) फलटण तालुकाध्यक्ष संजय गायकवाड, शहराध्यक्ष महादेव गायकवाड, शहर उपाध्यक्ष अजित मोरे, फलटण शहर कार्याध्यक्ष प्रसाद भैया शिंदे यांच्या सह्या आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |