09:19pm | Feb 11, 2021 |
फलटण : पिंप्रद, ता.फलटण येथे जमिनीच्या वादातून पारधी समाजातील महिलेला वादग्रस्त जागेतील झोपडीसह जाळल्याचा भिषण प्रकार घडला असून यामध्ये संबंधीत जळीत महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.
याबाबत कल्पना अशोक पवार (वय 45, रा.अलगुडेवाडी, ता.फलटण) यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरीजबाबानुसार; फिर्यादी महिलेचे सासरे झबझब पवार यांनी सुमारे 25 ते 30 वर्षांपूर्वी पिंप्रद, ता.फलटण येथे प्रल्हाद गोरख मोरे यांची गट नं.3 मधील 25 गुंठे जमीन खरेदी केली होती. मात्र सदरच्या जमिन प्रल्हाद मोरे व त्यांचे नातेवाईक फिर्यादीच्या कुटूंबाला वहिवाटू देत नसल्याने प्रल्हाद मोरे यांचा मुलगा राजू प्रल्हाद मोरे याच्यासोबत जमिनीवरुन वादविवाद होता. जमिन वहिवाटीसाठी 1 वर्षापूर्वी मोजणी आणून मोजणीनंतर संबंधीत जमीनीमध्ये झोपडी टाकण्यात आली होती. मात्र ती जमीन पिंप्रद येथील कुंडलिक कृष्णा भगत, सतिष भगत व राजु प्रल्हाद मोरे, कुमार मोरे यांनी पाडून टाकली होती. दि.10/2/2021 रोजी दुपारी 1:30 चे सुमारास फिर्यादी कल्पना पवार आपली मुलगी रोशनी, काजल, सून मातेश्री, नणंद महुली उर्फ मौली हे संबंधीत जागेत गेले आणि त्यांनी पुन्हा झोपडी उभारली व त्याच ठिकाणी स्वयंपाक करुन त्यांनी रात्रीचे जेवणखाण केले. रात्री 11 च्या सुमारास कुंडलिक कृष्णा भगत, सतिश भगत, राजु प्रल्हाद मोरे, कुमार मच्छिंद्र मोरे व सुनिल मोरे या पाच संशयितांनी जणांनी हातात दांडगे घेवून फिर्यादी व सोबतच्या कुटूंबियांवर अचानक हल्ला चढवला. त्यावेळी फिर्यादीची नणंद महुली उर्फ मौली या झोपडीमध्ये झोपलेल्या होत्या. सदर आरोपींनी यावेळी झोपडी पेटवून दिली आणि त्यामध्ये झोपडीत झोपलेल्या महुली उर्फ मौली या भाजून त्यांचा जागीच मृत्यू झाला. आरोपींनी फिर्यादी कल्पना पवार,त्यांची सून मातेश्री यांनाही मारहाण करुन जखमी केले असून झोपडी पेटवून देवून झोपडीमधील झोपलेली नणंद महुली उर्फ मौली झबझब पवार हिचा या पाच संशयित आरोपींना खून केला आहे, अशी तक्रार फिर्यादीनी आपल्या जबाबात केली आहे. रात्री उशिरापर्यंत या घटनेची माहिती देण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली होती.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |